⚜️हातचे सोडून....⚜️

⚜️हातचे सोडून....⚜️

    एक चतुर कुंभारीन होती. ती व्यवहारात खुपच हुशार होती. तिने कामासाठी एक गाढव पाळले होते. गाढव खुप कामाचे होते. ते आपल्या मालकीनीच्या सेवेला तत्पर असायचे. कसे पण काम असले की ते पटकन करायचे. छान चालले होते.
      एके दिवशी तिच्या मनात आले की आपण नविन गाढव आणावे. हे आपल्या काही कामाचे नाही. मग ती अशीच जनावरांच्या बाजारता गेली असता, त्या बाजरात खुप गाढवं विकायला आली होती. तिल्या त्यात एक पायाने लगंडं गाढव आवडलं.तिला वाटलं, हे गाढवच आपल्यासाठी योग्य असेल. ते जास्त विनाकारण बाहेर जास्त फिरणार नाही. कामापुरतं छान असेल. मग तिने पहिल्या गाढवाला विकले. नविन गाढव पण तिला कामात चांगली मदत करु लागले. थोडे दिवस गेले. मग त्या गाढवाने आपले अवगुण दाखवायला सुरुवात केली.
   पण ते चांगलेच खोडीचे होते. त्याने एक दिवस रागात मालकीनीच्या तोंडावर पायाचा फटका दिला. तिचे पुढले दोन दातच पडले. मग तिला समजले की आपले पहिलेच गाढव चांगले होते. पण आता काही उपयोग नव्हता..

तात्पर्य-हातचे सोडून पळत्याच्या मागे कधीच लागू नये.