म्हणीवर आधारित गोष्ट
ऊंटावरचा शहाणा.
एका खेड्यात एक शेतकरी राहात होता. त्याच्या जवळ म्हैस होती.
ही भली मोठ्ठी शिंग होती तिला . ती शेतकर्याची एकदम लाडकी होती. उकाड्याचे दिवस
होते आणि म्हैस भलतीच तहानलेली होती. अंगणात एक भला मोठ्ठा रांजण होता जो त्या
शेतकर्याच्या घरात पिढ्यांन पिढ्यां पासून होता. म्हैशीनं रांजणात डोकावून पाहील.
तिला तळाशी पाणी दिसलं आणि कसबस तिने घातल डोक आतं. पाणी पिउन झाल्यावर डोक काही
बाहेर येइना. बिचारी जोर जोरात हंबरायला लागली, शेतकरी धावत बाहेर आला. त्याने
पण म्हैशीच अडकलेल डोक बाहेर काढायचा बराच प्रयत्न केला पण काही जमेना. रांजण
फोडून म्हैशीला सोडवाव तर तो रांजण पिढ्यांन पिढ्यां चालत आलेला. शेतकर्याच मन
धजेना.
शेतकर्याची ही धडपड तिथून ऊंटावरून जाणार्या एका वाटसरूनं
पाहिली. तो शेतकर्याला म्हणालाकी तो त्याला म्हैशीच डोक बाहेर काढायला मदत करेल.
पण तो त्याच्या ऊंटावरून खाली येणार नाही. आणि अंगणातल दार छोट असल्याने ऊंट काही
आत येइना. शेवटी शेतकर्यानं कुदळ फावडं घेउन भींत फोडली नि त्या शहाण्याला वाट
करून दिली. वाटसरूनही वरून पाहिल म्हैशीच डोक बऱ्यापैकी अडकल होत. त्याने
शेतकऱ्याला विचारल कि रांजण आणि म्हैस यात त्याला काय जास्त प्रिय आहे. शेतकर्याला
बिचार्याला दोन्हीच प्रिय, पण
त्यतल्या त्यात रांजण पिढ्यांन पिढ्यां चालत आलेला त्यामुळे त्याने रांजण सांगितल.
झालं, या
शहाण्याने शेतकर्याला म्हैशीची मान कापायला सांगितली. रांजण वाचावायचा म्हणून
शेतकर्यानं जड मनाने म्हैशीला मारल. पण तिच डोक आतच राहील. शेवटी म्हैशीच डोक
बाहेर काढण्यासाठी शहाण्याने तो रांजणही फोडायला लावला.
जर शेतकर्याने ऊंटावरच्या शहाण्याचा सल्ला न ऐकता आधिच तो
रांजण फोडला असता तर, त्याला
अंगणाची भींतही फोडावी लागली नसती आणि त्याची लाडकी म्हैस पण वाचली असती.
तेव्हा पासून जो कुणी असा सल्ला देउ लागला की ज्यात ऐकणार्याच
फायद्यापेक्षा नुकसानच जास्त आसेल तर तो सल्ला देणार्याला ऊंटावरचा शहाणा ही उपाधी मिळु लागली.