विद्याधन उपक्रम - शालेय पोषण आहार

MDM मधील मागील राहिलेल्या दिवसाची माहिती कशी भरावी?


   MDM मधील मागील  माहिती भरण्यासाठी सुविधा सध्या सुरू आहे.

त्यासाठी तुम्हाला पुढील बाबींची आवश्यकता आहे.

 केंद्रप्रमुखांचा - User ID  आणि  Passwor

 MDM मागील माहिती भरण्यासाठी  खालीलप्रमाणे कृती करा.

1) खालील वेबसाइट वर जाऊन केंद्रप्रमुख युजर आयडी व पासवर्ड ने लॉगिन करा.
   https://education.maharashtra.gov.in/mdm
2) त्यानंतर जी स्क्रीन ओपन होईल. त्यामधील वरच्या आडव्या पट्टीवरील -
       MDM Daily INFO वर क्लिक करा.
 3) आता तुम्हाला मागील ज्या तारखेची माहिती भरायची आहे किंवा भरलेली आहे की नाही याची खात्री करायची आहे ,तो महिना व तारीख कॅलेंडर मधून निवडा.
 4) जर मागील माहिती भरायची असेल तर Total, Info received आणि pending या तीन पैकी Pending  शब्द निवडा.
5) उजव्या बाजूला Result बटन दिसते त्यावर क्लिक करा.
6) आता खाली cluster name मधील तुमच्या केंद्राचे नाव दिसेल त्या नावावर क्लिक करा.
7) तुम्हाला आता आपल्या केंद्रातील सर्व शाळांची यादी दिसेल. यामध्ये आपली शाळा शोधा.त्यामध्ये तुमच्या शाळेची  माहिती भरलेली नसेल तर सर्व कॉलम blank दिसतील. व सर्वात शेवटच्या कॉलम मध्ये Add दिसेल.
8) त्यानंतर Add वर क्लिक केले की तुमच्या शाळेची त्या तारखेची माहिती भरण्यासाठी स्क्रीन येईल. माहिती भरा व वरील कोपर्‍यात Update शब्दावर क्लिक करा.
9) त्यानंतर तुम्हाला माहिती Successfully असा मेसेज येईल.
 10) अशी कृती ज्या ज्या दिवसाची माहिती भरायची आहे त्या त्या वेळी MDM daily info वर क्लिक करायचे आहे.लक्षात ठेवा की प्रत्येक दिवसाची माहिती भरण्यासाठी ही कृती स्वतंत्रपणे करायची आहे.
        धन्यवाद.......