⚜️भाषिक उपक्रम -' कान ' या अवयवांशी संबंधित वाक्प्रचार व त्यांचे अर्थ⚜️

' कान ' या अवयवांशी संबंधित वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

=================================================

(१) कानात बोळे घालणे ---  मुद्दाम न ऐकणे.

(२) कान झाकून घेणे ---  न ऐकणे,  बोलण्याकडे दुर्लक्ष करणे.

(३) कान फुंकणे ---  दुसर्‍याची निंदानालस्ती करणे.

(४) कानपिचक्या देणे ---  दोष दाखवण्यासाठी समज देणे.

(५) कान भरणे ---  एखाद्याविषयी संशय किंवा गैरसमज निर्माण करणे.

(६) कानीकपाळी ओरडणे ---  वारंवार बजावून सांगणे.

(७) कानाखाली वाजवणे ---  मारणे,  कानशिलात भडकावणे.

(८) कान उपटणे ---  समज देणे,  अद्दल घडवणे.

(९)  कान धरणे ---  शिक्षा करणे.

(१० ) कान फुटणे ---  अजिबात ऐकू न येणे,  बहिरे होणे.

(११) कान किटणे ---  एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा ऐकून कंटाळणे.

(१२) कान देणे ---  लक्षपूर्वक ऐकणे.

(१३) कानठळ्या बसणे ---  कर्कश आवाजामुळे ऐकू न येणे.

(१४) कर्णोपकर्णी होणे ---  सर्वांना समजणे.

(१५) हलक्या कानाचा असणे ---  खोटी गोष्ट लगेच खरी वाटणे.

(१६) कानात बोटे घालणे ---  नको असलेली भयंकर गोष्ट न ऐकणे.

(१७) कानी लागणे ---  एखाद्याच्या गुप्तपणे चहाड्या करणे.

==================================================