⚜️सोन्याची कुदळ⚜️
एका माणसाला दोन मुले होती जेव्हा तो म्हातारा झाला.
तेव्हा त्याने आपल्या दोन्ही मुलांना बोलावले आणि म्हटले,' आता
माझे वय झाले आहे, देवाचे कधी मला बोलावणे येईल आणि मरण्यापूर्वी
मी तुम्हाला काही सांगू इच्छितो. पैसा हा भांडणाचे मूळ आहे. त्यामुळे मी
माझ्यासमोरच पैशाची विभागणी करू इच्छितो, माझ्याकडे एक
करामती कुदळ आहे. तिला जितके चालवाल तितके सोने ती उकरते. एकीकडे ही कुदळ आहे आणि
दुसरीकडे सारे धन-संपत्ती, तुम्ही सांगा की कोण काय घेणार?
मोठ्या मुलाने विचार केली की कुदळीला कोणी चोरले तर आपल्याकडे
काहीच राहणार नाही. त्यामुळे धन-संपत्ती घ्यायला पाहिजे. लहान मुलाने विचार केला
की नेहमीच सोने उकरणारी कुदळ घ्यायला पाहिजे. अशाप्रकारे मोठ्या मुलाने धनसंपत्ती
आणि छोट्या मुलाने कुदळ घेतली. वडील हरिद्वारला निघून गेले. त्यांचे नियंत्रण
सरकताच मोठ्या मुलाने पैसा पाण्यासारखा पैसा खर्च करायला सुरुवात केली आणि काही
काळानंतरच तो गरीब झाला. इकडे लहानमुलाने शेतात जाऊन कुदळ चालवणे सुरु केले परंतू
त्यातून मातीच निघाली. सोने नाही, तो हैराण झाला की
वडिलांनी आपल्याला खोटे का सांगितले?मग त्याच्या आत्म्याने
म्हटले,'' नाही, वडील खोटे बोलू शकत
नाहीत. एक दिवस कुदळ सोने अवश्य देईल आणि आपण श्रीमंत होऊ.'' असा विचार करून तो दररोज शेतात कुदळ चालवायचा. त्याने शेतात पिकाची पेरणी
केली आणि भरघोस पीक आले. गावात सर्वात जास्त पीक त्याच्या शेतात आले होते. अशा
प्रकारे कुदळीने वास्तवात सोने दिले होते आणि तो श्रीमंत झाला.
तात्पर्य:- संपन्नतेची
खरी चावी परिश्रमात आहे. जो परिश्रम करीत असतो त्याच्या घरी समृद्धी, सुख
अवश्य येते.