⚜️ *विद्याधन भाषिक
उपक्रम – शब्दसंपत्ती* ⚜️
========================================================
*संकलक*
:श्री.ब.मो.औटी. पदवीधर
प्राथमिक शिक्षक, जि.प.प्राथ.शाळा
जांभळी,
केंद्र - सडे, ता.राहुरी, अहमदनगर,
📞9421334421,
https://t.me/ABM4421
====================================================
●खालील प्रश्न कोड्यांची
उत्तरे शोधा व आपल्या वहीत लिहा.
1) पंख
नाहीत
पण
उडे
आकाशी,
शेपूट
हलवितो
पण
नाही
प्राणी –
सांगा
पाहू
मी
कोण ?
2) वरुन
लोंबतात
मुळे
माझी, गर्द
सावली
थंडगार,
सावलीत
माझ्या
विसावतात, सारे
लहान
थोर, सांगा
पाहू
मी
कोण ?
3) एका
रिंगणात
तीन
भाऊ, निरनिराळ्या
उंचीचे,
सारखे
पळतात
गोल
गोल
न
अडखळता
न
आदळता. सांगा
पाहू
मी
कोण ?
4) पाय
असून
चालत
नाही, हात
असून
काम
नही,
पाठ
असून
टेकत
नाही, ओळखा
पाहू
मी
कोण ?
5) लाल
रसदार
दाणे
गर्दीत
बसले, सांगा
पाहू
फळ
हे
कसले ?
6) सरसर
सरसर
वाहते, माणसाच्या
उपयोगी
पडते,
नदीही
नाही
मी
झराही
नाही, ओढाही
नाही
मी
ओहोळही
नाही, सांगा
पाहू
मी
कोण ?
7) गिरुने
दिला
हा
वसा, शिष्य
चालविती
वारसा
दिल्याने
वाढतच
राहते, सांगा
पाहू
असे
भांडार
कोणते ?
8) भाऊ
भाऊ
दोघे
जण, वडील
मुलगा
दोघेजण,
काका
पुतण्या
दोघेजण, घड्याळं
होती
फक्त
तीन,
प्रत्येकाच्या
वाट्याला
आलं
एक
घड्याळ, सांगा
बरं
हे
असं
झालं
कसं
बाळं ?
9) हिरवा
हिरवा
बंगला, लाल
लाल
माती,
आत
राहती
भाराभर, काळे
गोरे
किती, सांगा
पाहू
मी
कोण ?
10) मी
लाल
लाल, माझं
पागोटं
हिरवंगार,
ओळखा
पाहू
मी
कोण
सरदार ?
संकलक
श्री.
बबन मोहन औटी.
पदवीधर
प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ.
शाळा जांभळी,
केंद्र
- सडे, ता. राहुरी.
जि.अहमदनगर
📞 *9421334421*
https://t.me/ABM4421
===================================================
उत्तरे :-
१) पतंग, २) वड, ३) घड्याळचे
काटे, ४) खुर्ची, 5) डाळींब, ६) लेखणी, 7) ज्ञानभांडार, ८) दोन भाऊ व एका भावाचा मुलगा, ९) कलिंगड, १०) टॉमेटो