⚜️ विद्याधन उपक्रम – परिसर अभ्यास ⚜️
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
========================================================
विषय :- खालील विविध वनस्पतींची माहिती शोधा..
खाली काही वनस्पती प्रकार दिले आहेत. त्या प्रत्येक वनस्पती
प्रकाराचे कमीत कमी दोन उदाहरणे आपण शोधून आपल्या वहीत लिहा. आणि आपल्या
शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. यासाठी आपण आपल्या शिक्षकाची, मित्रांची, पालकांची मदत घेवू शकता आणि आपले भाषिक ज्ञान वाढवू शकता.
(१) औषधी वनस्पती --
(२) औषधी झुडपे --
(३) वेलवर्गीय औषधी वनस्पती --
(४) परसबागेमध्ये लागवडी योग्य औषधी वनस्पती --
(५) फुलशेतीच्या वनस्पती --
(६) फळवर्गीय वनस्पती --
(७) भाजीपाला फळवर्गीय वनस्पती --
(८) वेलवर्गीय भाजीपाला वनस्पती --
(९) मूळवर्गीय भाजीपाला --
(१०) मसाला पदार्थ वनस्पती --
(११) वेलवर्गीय फळे --
(११) पानवर्गीय भाज्या --
(१२) शेंगवर्गीय भाजीपाला --
(१३)भक्कम खोडाच्या वनस्पती --
*संकलक*
श्री. बबन
मोहन औटी.
पदवीधर
प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ.
शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी.
जि.अहमदनगर
📞 9421334421
https://t.me/ABM4421
=========================
उत्तरे:- (१) हिरडा, कुंभा, पळस, मोहा, जांभुळ, खैर, बेल, आवळा, बेहडा. (२) तुळस, आंबे हळद,
सर्पगंधा, अश्वगंधा, वेखंड. (३) शतावरी,
गुळवेल, कांडवेल.(४) कोरफड, तुळस, गवतीचहा,
सब्जा, पुदीना, पान ओवा,
कढीपत्ता, अडुळसा. (५) गुलाब, निशिगंधा, अॅस्टर, झेंडू
, शेवंती, (६) द्राक्षे, डाळिंब, सीताफळ, अंजीर,
बोर, चिकू, नारळ,
चिंच, जांभूळ, पेरू, आवळा,
मोसंबी, स्ट्रॉबेरी, पपई,
(७) वांगी, टोमॅटो, भेंडी
(८) कारली, काकडी, दुधी
भोपळा, दोडका, घेवडा, वाल. (९) मुळा, गाजर, बीट, रताळे, अळू. (१०) हळद, लसूण, मिरची, आले, मिरी, जिरे, (११) टरबूज, काकडी, खरबूज.(११) मेथी, कोथिंबीर, पालक,
कोबी (१२) गवार, मटार ,
शेवगा, चवळी (१३) वड,
पिंपळ, आंबा, चिंच,
गुलमोहर.