⚜️विद्याधन भाषिक उपक्रम – शब्दसंपत्ती‌‌‌‌- विशेषण⚜️




️ *विद्याधन भाषिक उपक्रम – शब्दसंपत्ती* 
 ========================================================
खाली काही क्रिया दिल्या आहेत. एखादी क्रिया दाखवतांना ती कशी विशेष आहे हे दाखविण्यासाठी विशेषण लागते. तर त्यांचे तुम्ही चार अक्षरी विशेषण लिहायचे आहे. चार अक्षरी असणाऱ्या या विशेषणाचे शेवटची दोन अक्षरे 'कन' अशी आहेत. ती शोधा व आपल्या वहीत लिहा.

उदा.: उडी मारली – टुणकन

१) चिमणी उडाली -
२) कागद फाडला-
३) अंगावर ओरडला-
४) हसु आले -
५) दु:खाने खाली बसला -
६) मुस्काटात दिली -
७) दार आपटले -
८) थुंकला-
९) मास्यासारखा पोहला-
१०) काम उरकले-
११) काच फुटली -
१२) गिरकी घेतली –
१३) अंगावर काटा आला -
१४) डोळ्यात पाणी आले -
१५) एकदम उभा राहिला -
१६) झाडावर बसला -
१७) कानाखाली लगावली -
====================================================
*संकलक*
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडेता. राहुरी. जि.अहमदनगर
📞  *9421334421*


https://t.me/ABM4421

             ================================================= 
उत्तरे :- १) भुर्रकन, २)  टर्रकन, ३) वसकन, ४) खुदकन, ५) मटकन, ६) फाडकन, ७) दाणकन, ८) पचकन, ९) सुळ्ळकन, १०) पटकन, ११) खळ्ळकन, १२) गर्रकन, १३) सर्रकन, १४)  टचकन, १५)  झटकन, १६) टुणकन, १७) सणकन