⚜️मैत्री दोन वाघाची⚜️
एका जंगलात दोन वाघ असतात. दोघेजण अगदी जवळचे मित्र
असतात. लहानाचे मोठे एकत्र झाले, खूप काही शिकले, जंगल पाहिले, जंगलाचे कायदे-कानून समजवून घेतले,
एकत्र शिकार केली...
एक दिवस
एका फालतू कारणामुळे त्यांच्यात भांडण होते आणि दोघे वेगळे होतात. बरीच वर्षे जातात. एकदिवस त्यातील एका वाघाचे
विवळणे दुसऱ्याला ऐकू येते. दुसरा त्या दिशेने जातो तर काही कुत्र्यांनी त्या
वाघाच्या परिवारावर हल्ला केलेला असतो आणि त्यामध्ये तो परिवाराला वाचवण्याच्या
नादात गंभीर जखमी झालेला असतो...
दुसरा वाघ त्या कुत्र्यांना केळीची साल
फाडल्यासारखं फाडतो आणि घरी जातो. त्याचा मुलगा त्याला विचारतो "पप्पा तो आता
तुमचा मित्र नाही तुमची भांडणं झाली, मग तुम्ही त्याच्या मदतीला का धावून
गेला?".
वाघ
म्हणतो,
"बाळा मैत्री एवढी पण कमजोर असू नये की कुत्र्यांना पण बळ
येईल"
तात्पर्य:- फालतू कारणांमुळे किंवा गैरसमजुतीमुळे वाघासारख्या मित्रांना दूर नका करू.
जेणेकरून कुत्र्यांना पण बळ येईल.