⚜️ *विद्याधन भाषिक
उपक्रम – शब्दसंपत्ती* ⚜️
========================================================
श्री.ब.मो.औटी. पदवीधर
प्राथमिक शिक्षक, जि.प.प्राथ.शाळा
जांभळी,
केंद्र - सडे, ता.राहुरी, अहमदनगर,
====================================================
खाली काही शब्द समूह दिले आहेत. त्या प्रत्येक
शब्द समूहाबद्दल तीन अक्षरी शब्द शोधायचा आहे. त्या प्रत्येक शब्दाच्या शेवटी *डा*
हे अक्षर येते. असे शब्द शोधून आपल्या वहीत लिहा.
१)तोंडाचा खाण्यासाठीचा भाग
२)भिंतीतील मोकळी जागा
३)याचा रंग तीन दिवस
४)पावसाळी पवित्र वनस्पती
५)रतीब/गरमी`
६)रंग बदलू प्राणी
७)ओलावारहित
८)वस्त्र
९)अधोमुख
१०)एक मंगल वाद्य
११)कडीचा साथी
१२)एक मळखाऊ रंग
१३)वक्र
१४)जादा रुंद
१५)वेढा
१६)शाहिरी कवन
१७)बिच्चारा
१८)तगादा
१९)कुंकवाची डबी
२०)बैलगाडी
२१)हाडांचा सापळा
२२)निकाल
२३)एक पक्षी
२४)नांगीदार पाणजीव
२५)एक शेंगभाजी
२६)लोकप्रिय खाद्य पदार्थ
२७)भांडण
२८)पहाट आरती
२९)ठोकण्याचे हत्यार
३०)पावलाचा पुढचा भाग
३१)भाजलेली ज्वारीची कणसं
३२)नाकखुपसू
३३)अत्यल्प वस्त्रधारक
३४)एक लोकन्ऋत्य
३५)एक केशरचना
३६)साधाभोळा
३७)केतकी
३८)जाडंभरडं सुती
३९)पोटातील कळा
४०)मूर्ख,बिनडोक
४१)मिरचीचे व्यंजन खरादा
४२)पोक असलेला
४३)पहाटेचा आकाशरंग
४४)डाका
४५)हा पैशाचा किंवा काचेचा होतो.
*संकलक*
श्री.
बबन मोहन औटी.
पदवीधर
प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ.
शाळा जांभळी,
केंद्र
- सडे, ता. राहुरी.
जि.अहमदनगर
📞 *9421334421*
https://t.me/ABM4421
==============================
उत्तरे :- १)जबडा,
२)कोनाडा, ३)तेरडा, ४)आघाडा, ५)उकाडा, ६)सरडा,
७)कोरडा, ८)कपडा, ९)उपडा,
१०)चौघडा, ११)कोयंडा, १२)करडा,
१३)वाकडा, १४)फताडा, १५)गराडा,
१६)पोवाडा, १७)बापडा, १८)लकडा,
१९)करंडा, २०)छकडा, २१)सांगाडा,
२२)निवाडा, २३)कोंबडा, २४)खेकडा,
२५)घेवडा, २६)चिवडा, रगडा, २७)बखेडा, २८)काकडा, २९)हातोडा,
३०)चवडा, ३१)हुरडा, ३२)चोमडा,
३३)नागडा, ३४)भांगडा, ३५)अंबाडा,
३६)भाबडा, ३७)केवडा, ३८)सुताडा,
३९)मुरडा, ४०)गधडा, ४१)खरडा, ४२)वाकडा,
४३)तांबडा, ४४)दरोडा, ४५)चुराडा