⚜️प्रेरणा⚜️
संत
राबिया रोज पक्ष्यांना धान्याचे दाणे टाकीत असत. हा त्यांचा रोजचा नियम होता.
उर्वरित वेळेत त्या अध्ययन आणि अध्यात्मिक चर्चा करीत असत. एके दिवशी त्या सकाळी
कबुतरांना दाणे टाकीत असताना, पाच-सहा तरुण तेथे फिरत फिरत आले आणि
संत राबिया यांच्याजवळ येऊन उभे राहिले. संत राबियानी त्याच्यांकडे पाहून
स्मितहास्य केले आणि नंतर मोठ्याने हसू लागली. ती का हसते ? हे
त्या तरुणांना कळले नाही. त्यांनी तिच्याजवळ तिच्या हसण्याचे कारण विचारले असता ती
म्हणाली,"मी यामुळे हसले कारण या धरतीवर तुमच्यासारखे
सजलेले, सुंदर आणि बलशाली तरुण आहेत. ती धरतीमाता किती
भाग्यशाली आहे. माझे हसू हे देवाप्रती आभाराचे आहेत." हे ऐकून ते तरुण तिथेच
उभे राहिले. राबियांचे कबुतराला दाणे टाकण्याचे कामही चालूच होते. त्या त्यांच्या
कामात मग्न होत्या. मग काही वेळाने त्या रडू लागल्या. तरुणांना कळेना कि काही
वेळापूर्वी हसणारी हि स्त्री अचानक का बरे रडू लागली. ते त्यांच्याजवळ गेले व
पुन्हा त्यांना रडण्याचे कारण विचारले. त्यावेळी राबिया त्यांना म्हणाल्या,"
आधी मी हसले होते धरतीवर किती बलशाली तरुण आहेत पण हे तरुण
त्यांच्या इच्छाशक्तीचा, बलाचा वापर सेवेसाठी करत नाहीत.
तरुणांनी या बलाचा वापर जर सृजनासाठी केला तर जगाचे किती कल्याण होईल. असे होत
नाही आणि त्यांची बुद्धी त्यांना हे करण्याची का प्रेरणा देत नाही या गोष्टीने मला
रडू आले." तरुणांना आपली चूक लक्षात आली. राबियाने त्यांना प्रेरित केले.
त्यांच्याकडून सेवा करून जरी घेता आली नाही तरी तहानलेल्याना पाणी, भुकेलेल्याना अन्न आणि मायेचे दोन शब्द प्रत्येकासाठी द्यायला हवे हे
त्यांना समजावले.
तात्पर्य :-
प्रत्येकाने जर थोडे थोडे सत्कार्य केले तर जग सुंदर दिसण्यास वेळ लागणार
नाही. दुसरा कोणी करण्याची वाट पाहण्यात आयुष्य संपून जाते.