⚜️ विद्याधन उपक्रम – भाषिक खेळ शब्दांचा लपंडाव २ ⚜️

 विद्याधन उपक्रम – भाषिक खेळ शब्दांचा लपंडाव २ 
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
 ========================================================

खाली काही वाक्य दिली आहेत. त्या प्रत्येक वाक्यातील प्रत्येक शब्दाच्या अद्याक्षरापासुन तयार होणारे तीन अक्षरी अर्थपूर्ण शब्द लपलेले आहेत. ते अर्थपूर्ण शब्द तयार करून आपल्या वहीत लिहा आणि आपल्या शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. यासाठी आपण आपल्या शिक्षकाची, मित्रांची, पालकांची मदत घेवू शकता आणि आपले भाषिक ज्ञान वाढवू शकता.
उदा:- 
वाक्य:- आरीफने काव्य  रचले.
वाक्यात लपलेला शब्द :-  आकार

कापूर  जपून वापरा  - ---------
सर्वांनी  मानाने जगावे - ---------
कमल नमन कर - ---------
) सरु  फळ्यामागे  लपली - ---------
वनिताने जयरामला नटवले  - ---------
गावात  जया रमली - ---------
) शिलाने काम रखडवले - ---------
)  आम्ही  वाघनखे जमविली - ---------
) आरोही डफ वाजवते - ---------
१०) कान्हाने  सारसला  रडवले  - ---------
      

संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडेता. राहुरी. जि.अहमदनगर
📞  9421334421

https://t.me/ABM4421
============================== 
उत्तरे:- )काजवा )समाज )कनक ४ )सफल )वजन )गाजर )शिकार )आवाज )आडवा १०)कासार