⚜️विद्याधन भाषिक उपक्रम – शब्दसंपत्ती⚜️


 *विद्याधन भाषिक उपक्रम शब्दसंपत्ती* 
 ========================================================
*संकलक* :श्री.ब.मो.औटी. पदवीधर प्राथमिक शिक्षकजि.प.प्राथ.शाळा जांभळी,  
केंद्र - सडेता.राहुरीअहमदनगर
📞9421334421, 
https://t.me/ABM4421 
====================================================
खाली काही शब्द समूह दिले आहेत. त्या प्रत्येक शब्द समूहाबद्दल तीन अक्षरी शब्द शोधायचा आहे. त्या प्रत्येक उत्तर असणाऱ्या शब्दाच्या शेवटी 'ळी' हे अक्षर येते. असे शब्द शोधून आपल्या वहीत लिहा.

 1.  एक कडधान्य 
2.   फणसातील बी 
3.   कृत्रिम दात 
4.   केरळमध्ये राहणारा माणूस
5.   पावसाचे पाणी पत्र्यावरून खाली पडते 
6.   वाळलेली केळी 
7.   सकाळी म्हणायचे भजन 
8.   नारळाच्या झाडाची फांदी 
9.   पायच्या बोटातील दागिना 
10. एक रंग 
11. पुरात न मोडणारे
12. संतांच्या हातातील वाद्य 
13. तीन ठिकाणची केलेली यात्रा 
14. अनेक डाळींच्या पिठाचा घावन 
15. श्रीखंड बासुंदीत शोभेसाठी घालतात
16. मदतीसाठी मोठ्याने मारतात ती 
17. सण  समारंभात दारात काढतो ती 
18. दूध घालतो तो
19. दिव्यांचा सण
20. संक्रातीला या रंगाची साडी नेसतात
21. छतावरून खाली पडणारे पावसाचे पाणी
22. झोपेतून उठवण्यासाठीचे गीत
23. अनेक डाळींच्या पिठाचे घावन 
24. श्रीखंड,बासुंदीत घालतात ती
25. रिक्त जागा
26. विड्याची पाने विकणारा
27. डोळ्यासमोरील अंधारी 
28. दुरडी
29. कपडयाची करतात ती वळकटी 
30. टवाळकी करणारे 
31. सोनाराचा चिमटा 
32. घोंगडी 
33. मांसाचे बारीक तुकडे 
34. घामाने आलेले पुरळ 
35. गोंधळ घालणारी व्यक्ती 
36. चार ओळींची कविता 
37. वाघ्याची जोडीदार
38. जबडा 
39. जीभ खरडण्याची काडी 

*संकलक*
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞  *9421334421*


https://t.me/ABM4421
                  ==============================================
उत्तरे :- 1) चवळी, 2)आठळी, 3)कवळी, 4)केरळी/ मल्याळी, 5)पन्हाळी, 6)सुकेळी, 7)भूपाळी, 8)झावळी, 9)मासोळी, 10)सावळी / शेवाळी, 11)लव्हाळी, 12)चिपळी, 13)त्रिस्थळी, 14)आंबोळी, 15)चारोळी, 16)आरोळी, 17)रागोळी, 18)गवळी, 19)दिवाळी, 20)पिवळी, 21)पागोळी, 22)भुपाळी, 23)आंबोळी, 24)चारोळी, 25)मोकळी, 26)तांबोळी, 27)भोवळी, 28)रोवळी, 29)गुंडाळी, 30)टवाळी, 31)चिपळी, 32)कांबळी, 33)खांडोळी, 34)घामोळी, 35)गोंधळी, 36)चारोळी, 37)मुरळी, 38) कवळी, 39)जिभळी,