⚜️ विद्याधन उपक्रम – भाषिक खेळ शब्दांचा
लपंडाव ४ ⚜️
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
========================================================
खाली काही नामरूपी शब्द दिले आहेत. त्या प्रत्येक शब्दात
त्याचा गुण लपलेला आहे. तो गुणवाचक शब्द शोधून आपल्या वहीत लिहा आणि आपल्या शिक्षकांना
तपासण्यासाठी पाठवा. यासाठी आपण आपल्या शिक्षकाची, मित्रांची, पालकांची मदत घेवू शकता आणि आपले भाषिक ज्ञान वाढवू शकता.
उदा:-
शब्द
:- फूल
गुण :- कोमलता
१) दगड - ----------
२) मिरची - ----------
३) तारा - ----------
४) मिठाई - ----------
५) चिंच - ----------
६) सागर - ----------
७) वाळवंट - ----------
८) विमान - ----------
९) सुर्य - ----------
१०) मीठ - ----------
११) कारले - ----------
१२) आवळा - ----------
१३) कुत्रा
- ----------
१४) औषधे - ----------
१५) ससा - ----------
संकलक
श्री. बबन
मोहन औटी.
पदवीधर
प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ.
शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी.
जि.अहमदनगर
📞 9421334421
https://t.me/ABM4421
====================================
उत्तरे:- १)कठीणपणा
२)तिखटपणा ३)तेजस्वीपणा ४)गोडपणा ५)आंबटपणा ६)विशालता ७)प्रखरता ८)गतीशिलता ९)उष्णता १०)खारटपणा ११)कडूपणा १२)तूरटपणा १३)प्रामाणिकपणा १४)कडूपणा १५)भित्रेपणा