⚜️विद्याधन भाषिक खेळ_रामनामयुक्त शब्द ...⚜️



विद्याधन भाषिक खेळ_रामनामयुक्त शब्द ...

शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
 ========================================================
या ठिकाणी काही शब्दसमूह दिले आहेत. प्रत्येक समूहाच्या उत्तरात सुरुवातीला, मध्यभागी तर कधी शेवटी *राम* हा शब्दसमूह येत आहे. तसेच उत्तर किती अक्षरी आहे हे त्यापुढील कंसात दिलेले आहे. असे रामनामयुक्त शब्द शोधून तुमच्या वहीत लिहा. आणि आपल्या शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. यासाठी आपण आपल्या शिक्षकाचीमित्रांचीपालकांची मदत घेवू शकता आणि आपले भाषिक ज्ञान वाढवू शकता. पाहू सर्वात प्रथम कोण शोधून दाखवतो?....

1)      संगीतातील एक राग(4)
2)     मारुती (4) –
3)      एक फळझाड (4) - 
4)    पांढरे रेशीमकाठी धोतर (4)–
5)     कारळे (4) –
6)     अचूक ,गुणकारी (4) –
7)     रामाचे स्तोत्र (4) –
8)     दासबोध ग्रंथ लेखक (4)  -
9)      थोर मराठी संत(4) –
10)   अगदी थोडीही(4) –
11)    सुंदर,रमणीय (4) –
12)   युक्ती,चातुर्य,कतृत्व (4) –
13)   निरोगी ,शांत (4) –
14) विचारपूस,समाचार (4) –
15)  तांबड्या पंखाचा पोपट (5) –
16)   कामाची धांदल गर्दी (5) –
17)  सत्यवचन (5 ) –
18)  सुर्योदयापासून पहिले 3 तास (4)–
19)   विश्रांती,सुख देणारे (5) –
20)  वाक्यात थांबण्यासाठीचे चिन्ह (5)  -
21)   वार्धक्य,मरण नाही असा (5) –
22)  परमेश्वराचा अवतार (5) –


संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडेता. राहुरी. जि.अहमदनगर
📞  9421334421
https://t.me/ABM4421

==============================

उत्तरे : - 1) रामकली, 2)रामदूत, 3)रामफळ, 4) रामकाठी, 5) रामतीळ, 6) रामबाण, 7) रामरक्षा, 8) रामदास, 9)तुकाराम, 10) सुतराम, 11) अभिराम, 12) करामत, 13) निरामय, 14) परामर्ष, 15) रामनगर, 16) रामरगाडा, 17)रामप्रतिज्ञा, रामवचन, 18)रामप्रहर, 19) आरामदायी, 20) विरामचिन्ह, 21) अजरामर, 22) परशुराम