⚜️विद्याधन भाषिक उपक्रम – सर्वांचा मित्र कोण ? ⚜️


विद्याधन भाषिक उपक्रम – सर्वांचा मित्र  कोण ? 
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
 ========================================================
या ठिकाणी काही अक्षरसमूह दिले आहेत. त्या प्रत्येक अक्षरासमूहात एक असे मित्र अक्षर आहे की जे इतर अक्षरासोबत येऊन एक नवीन अर्थपूर्ण दोन अक्षरी शब्द तयार होतो. दिलेल्या अक्षरसमूहापासून असे अर्थपूर्ण शब्द तयार करुन वहीत लिहा आणि आपल्या शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. यासाठी आपण आपल्या शिक्षकाचीमित्रांचीपालकांची मदत घेवू शकता आणि आपले भाषिक ज्ञान वाढवू शकता.  
 उदा:- 
अक्षरसमूह :- सा,ना,रा,गा,त,वा,भा,मा,का,हा
मित्र अक्षर :- त 
 तयार होणारे शब्द   :-   सात, नात, रात, गात, वात, भात, मात, कात, हात           


अक्षर समूह  1)    का,पा,गा,वा,जा,डी,सा,मा,ना

अक्षर समूह  2)    चू,धू,भू,र,सू,शू,पू,तू,खू

अक्षर समूह  3)    न,च,प,त,क,घ,ग,स,ट

अक्षर समूह  4)    क,व,म,प,घ,ण,स,ख,ग



संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडेता. राहुरी. जि.अहमदनगर
📞  9421334421
https://t.me/ABM4421
=================================================================
उत्तरे :  
1)डी-काडी,पाडी,गाडी,वाडी,जाडी,साडी,माडी,नाडी
2)र-चूर,धूर,भूर,सूर,शूर,पूर,तूर,खूर
3)ट-नट,चट,पट,तट,कट,घट,गट,सट  
4)ण-कण,वण,मण,पण,घण,सण,खण,गण