⚜️विद्याधन भाषिक खेळ_महिलांचे अलंकार...⚜️
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
========================================================
या ठिकाणी काही वाक्ये दिली आहेत. प्रत्येक
वाक्यात महिलांचा एक दागिना लपलेला आहे. वाक्यातील लपलेला दागिना शोधून वहीत लिहा
आणि आपल्या शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. यासाठी आपण आपल्या शिक्षकाची, मित्रांची, पालकांची मदत घेवू शकता आणि
आपले भाषिक ज्ञान वाढवू शकता.
1) माधव बोकील रमेशसह मालेगावला मंगळवारी गेले होते.
2) अबुधाबीच्या गणेशोत्सवाची सीडी पाहिली.
3) अमोल मोटर वाहन नियमावलीवर काहीबाही बरळत होता.
4) काळ्यांच्या अमेयने गीताचा खरपूस समाचार घेतला.
5) आपले बिंग फुटल्याने सुमादीदी वैतागली होती.
6) अनय पाणथळ जागा आहे, नीट लक्षपूर्वक चाल.
7) पोयसरला माहेर त्यामुळे पहाटेची ट्रेन पकडून घरगाठले.
8) सुनंदाचा तोरा अलीकडे फारच वाढला आहे.
9) नेहा तू कधी गं मालेगावला पोचलीस.
10) पैंनगंगा नदीजवळून गाडी आणली का?
11) काका जोग आडपडदा न ठेवता विद्याशी बोलले.
12) रंगीबेरंगी छत्र्या विकून रम्याने गल्ला जमवला.
13) पालीची वाट धरली की खड्डे सुरु होतात.
14) शामा सोलकढी वेगळीच करते.
15) सध्या नुसतं गुगलवर तैमुर आणि तैमुर.
16) बांधली सगळी गाठोडी आणि निघालो.
संकलक
श्री. बबन
मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक
शिक्षक
जि.प.प्राथ.
शाळा जांभळी,
केंद्र -
सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421
https://t.me/ABM4421
========================
उत्तरे:- 1)बोरमाळ 2)बुगडी 3)मोहनमाळ 4)मेखला 5)बिंदी 6)नथ 7)पोहेहार 8)तोडे 9)नेकलस 10)पैजण 11)जोडवी 12)छल्ला 13)वाकी 14)मासोळी 15)सर 16)बांगडी