⚜️विद्याधन भाषिक उपक्रम – शब्दसंपत्तीवर प्रभुत्व_म्हणी ⚜️


विद्याधन भाषिक उपक्रम – शब्दसंपत्तीवर प्रभुत्व_म्हणी
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
 ========================================================
या ठिकाणी काही म्हणी दिल्या आहेत. त्या म्हणीमध्ये काही अंक लपलेले आहेत. ते लपलेले अंक शोधून वहीत लिहा आणि आपल्या शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. यासाठी आपण आपल्या शिक्षकाचीमित्रांचीपालकांची मदत घेवू शकता आणि आपले भाषिक ज्ञान वाढवू शकता. पाहू तुम्ही प्रत्येक नावासाठी जास्तीत जास्त म्हणी कोण शोधतो ?
 उदा:- 
म्हण:- तेरड्याचा रंग तीन दिवस
 लपलेला अंक  :-  तीन           

१)       एक गाव बारा भानगडी
२)       नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न
३)       एक ना धड भाराभर चिंध्या
४)       चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे
५)       एकाच माळेचे मणी
६)       झाकली मुठ सव्वा लाखाची
७)       तीन तिघाडा काम बिघाडा
८)       नव्याचे नऊ दिवस
९)       पहिले पाढे पंचावन्न
१०)    पिंपळाला पाने चार
११)    आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे
१२)     दुष्काळात तेरावा महिना
१३)     पळसाला पाने तीनच
१४)     तीन तिघाडा काम बिघाडा
१५)     दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ
१६)     पाचामुखी परमेश्वर
१७)     एका हाताने टाळी वाजत नाही
१८)    आठ हात लाकूड आणि नऊ हात ढिपली
१९)     नवलाईचे नऊ दिवस
२०)     एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाही
२१)    चाराण्याची कोंबडी बारा आण्याचा मसाला
२२)     एकटा जीव सदाशिव
२३)     ओठात एक पोटात एक
२४)    एका कानाने ऐकावे दुसऱ्या कानाने सोडून द्यावे
२५)    हाताची पाची बोटं सारखी नसतात
२६)    साठी सामासी
२७)    चौदावे रत्न दाखवणे
२८)   तीनतेरा नऊ बारा


संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडेता. राहुरी. जि.अहमदनगर
📞  9421334421
https://t.me/ABM4421
======================
उत्तरे पाहण्यासाठी  खालील निळ्या रंगातील लिंकला क्लिक करा.
उत्तरे :)एक , बारा, २) सतराशे, ३) एक , ४)चार, ५) एक, ६) सव्वा लाख, ७) तीन, ८)  नऊ , ९) पहिले,  पंचावन्न, १०) चार, ११) एक, दोन, १२)तेरा, १३) तीन, १४) तीन, १५)दोन, तीन, १६) पाच, १७) एक, १८) आठ, नऊ , १९) नऊ, २०) एक, दोन , २१) चार, बारा , २२) एक, २३)एक, २४)एक, दोन २५) पाच, २६) साठ, २७) चौदा, २८) तीन, तेरा नऊ, बारा