⚜️विद्याधन भाषिक खेळ – स्वर चिन्हांची किमया ⚜️
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
==============================
या ठिकाणी काही अक्षरसमुहाचे गट दिले आहेत. त्यातील अक्षरांना वेगवेगळी स्वरचिन्हे जोडून जास्तीत जास्त शब्द तयार करून वहीत लिहा आणि आपल्या शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. यासाठी आपण आपल्या शिक्षकाची, मित्रांची, पालकांची मदत घेवू शकता आणि आपले भाषिक ज्ञान वाढवू शकता.
उदा:-
अक्षर गट :- ख, ड
तयार होणारे शब्द :- खडा, खाडी, खेडी, खडू, खंडू, खडे, खांड, खेडे, खुडा, खाडा, डेख, डंख
1) व, र
2) ग, र
3) त, प
4) प, ल
5) स, र
*संकलक :-*
श्री. बबन मोहन औटी.
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र – सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 *9421334421*
babanauti16.blogspot.com
==================
उत्तरे:- 1) वर, वार, वारी, वीर, वैर, रव, रवा, राव, रावा, रवि, रवी 2) गर, गरा, गार, गोरी, गिरी, गोरा, गेरू, गारा, राग, रंग, रांग, रिंग, रग, रोग, रोग 3) तप,ताप, तूप, पत, पात, पोते, पोत, पीत, पति, पाते, पंत, पूत 4) पाल, पूल, पेला, पैल, पाली, पाला, लप, लोप, लेप, लिपी 5) सर, सार, सुर, सारा, सूर, सौर, रस, रास