⚜️विद्याधन उपक्रम – भाषिक खेळ ४ ⚜️


विद्याधन उपक्रम – भाषिक खेळ ४ ⚜
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
 ========================================================
खाली काही वाक्ये दिली आहेत. तसेच कंसात काही शब्द दिले आहेत. प्रत्येक वाक्यात दोन्ही रिकम्या जागी कंसातील कोणताही एक आणि एकच शब्द वापरून अर्थपूर्ण वाक्य  तयार करुन आपल्या वहीत लिहा आणि आपल्या शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. यासाठी आपण आपल्या शिक्षकाचीमित्रांचीपालकांची मदत घेवू शकता आणि आपले भाषिक ज्ञान वाढवू शकता.

 उदा.:- 

शब्द :- उत्तर

वाक्य :- ------- दिशेला पहात ------ देण्याची त्याची पद्धत विचित्र होती खरी.

उत्तर:-  उत्तर दिशेला पहात उत्तर देण्याची त्याची पद्धत विचित्र होती खरी.

1)   ----- खाल्ल्याने म्हणे ---- आखडतात.

2)   आधी ---- पिऊन घ्या,मग एक झोप ----.

3)   ---- पत्करलीत ना,आता कोण ---- घालणार तुम्हाला?

4)   एक ---- सारखी त्रास देते म्हणून तो तिच्यावर ---- खातो.

5)   ----भर थांब,मग पाहिजे तिकडे ----.

6)   ---- सभेत मुलांच्या आहारात मेथी, ----यासारख्या पालेभाज्या असण्याविषयी चर्चा झाली.

7)   अरे,----वर्षी काय रे ---- वाढविता ?

8)   खराखरा ---- सांग,उगाच ---- खाऊ नको.

9)   नारळाचा ---- पिळून घेतल्यावर त्याला काहीच ----- रहात नाही.

10) त्याने त्याच्या ----- ची अगदी ----- नक्कल केली.

11) -----पक्षाची खोली ----- आहे का?

12) मुलांचा ----- त्यांना देऊन उरलेल्या खोबऱ्याची चटणी ------.

13) ----- सभेतील मंत्र्यांचे ----- चांगलेच गाजले.

14) फाटका शर्ट बायको जोवर ----- नाही तोवर मी त्याला ----- ही नाही.

15) भटजी म्हणाले, ----- हातात घेऊन विधी सुरू -----.

16) धार्मिक ----- करायला कोणताही ----- निषेध नसावा.

17) अभियंता मला म्हणाला,-----इथेच ------.

18) कामासाठी भिजवलेली ----- उन्हाने ----- लागली.

19) दरवर्षी नवीन प्राणी -----, मी निसर्गाशी बांधिलकी ----- असतो.

20) फुलांच्या ----- केसांत ----- .
               
               
संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडेता. राहुरी. जि.अहमदनगर
📞  9421334421
https://t.me/ABM4421

==================================

उत्तरे:- 1) शिरा, 2) काढा, 3) हार, 4) खार, 5) पळ, 6) पालक, 7) दर, 8) भाव, 9) चव, 10) सही, 11) वर, 12)वाटा, 13) विधान, 14) शिवत, 15) कर, 16) विधी, 17) बांध, 18) वाळु, 19)पाळत, 20)माळा