⚜️विद्याधन भाषिक उपक्रम - कोडी ...⚜️
शाळा
बंद ... पण शिक्षण आहे.
========================================================
या ठिकाणी काही गमतीदार रंजक कोडी दिली आहेत. दिलेली कोडी सोडवून
त्याची शोधून वहीत लिहा आणि आपल्या
शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. यासाठी आपण आपल्या शिक्षकाची, मित्रांची, पालकांची मदत घेवू शकता आणि आपले भाषिक ज्ञान वाढवू
शकता.
1. असा कोण आहे जो कधीच
प्रश्न करत नाही तरी सुद्धा तुम्ही त्याला उत्तर देता?
2. असा कोण आहे ज्याला चार
पाय आहेत तरी सुद्धा तो चालू शकत नाही?
3. काळा आहे पण कावळा नाही, लांब
आहे पण साप नाही,
फुले वाहतात पण देव नाही, तर सांगा पाहू मी कोण?
4. वीज गेली आठवण झाली, मोठी
असो किंवा लहान,
डोळ्यातून हिच्या गळते पाणी. तर सांगा पाहू कोण?
डोळ्यातून हिच्या गळते पाणी. तर सांगा पाहू कोण?
5. दात आहेत पण चावत नाही, गुंता
होतो काळ्या शेतात,
सगळे माझ्यावर सोपवतात. सांगा पाहू मी कोण?
सगळे माझ्यावर सोपवतात. सांगा पाहू मी कोण?
6. थांबून वाजते पण घड्याळ
नाही, बारीक लांब पण काठी नाही,
दोन तोंडची पण साप नाही, श्वास घेते पण तुम्ही नाही?
दोन तोंडची पण साप नाही, श्वास घेते पण तुम्ही नाही?
7. पाटील बुवा राम राम,
दाढी मिशी लांब लांब, ओळखा पाहू मी कोण?
दाढी मिशी लांब लांब, ओळखा पाहू मी कोण?
8. मुकुट याच्या डोक्यावर, जांभळा
झगा अंगावर
काटे आहेत जरा सांभाळून, चवीने खातात मला भाजून, ओळखा पाहू मी कोण?
काटे आहेत जरा सांभाळून, चवीने खातात मला भाजून, ओळखा पाहू मी कोण?
9. नका जोडू मला इंजीन,
लागत नाही मला इंधन,
पाय मारा भराभर,
धावते मी सरसर, ओळखा पाहू मी कोण?
10. असे कोणते फळ आहे जे
बाजारात विकले जात नाही?
11. असे काय आहे ज्यामध्ये
सगळं काही लिहलेले असते पण कोणीही ते वाचू शकत नाही?
12. असे काय आहे जे तुम्ही
झोपता तेव्हा ती सुद्धा पडते आणि जेव्हा तुम्ही उठता तेव्हा ती सुद्धा उठते?
13. असा कोण आहे ज्याच्याकडे झोपण्यासाठी
पलंग नाही, राहण्यासाठी महल नाही,
आणि विशेष म्हणजे
त्याच्या कडे एक रुपया देखील नाही तरी तो राजा आहे?
14. अशी कोणती गोष्ट आहे जी
सगळी मुले खातात, पण मुलांना ते आवडत नाही?
15. सांगा बर असे कोण आहे जे
फाटते पण त्यातून आवाज येत नाही?
16. हा बागेत भेटत नाही, पण
हा अर्धा फुल आणि अर्धा फळ आहे,
दिसायला आहे काळा पण खूप गोड आहे, सांगा बर मी कोण?
17. अशी कोणती गोष्ट आहे जी
वाचन आणि लिहण्यासाठी उपयोगी येते पण ती वस्तू पेन किव्हा कागद नाही आहे?
18. अशी कोणती जागा आहे जिथे
माणूस गरीब असो वा श्रीमंत,
दोघांना सुद्धा वाडगा
घेऊन उभा राहायला लागते?
19. अशी कोणती गोष्ट आहे
ज्यामध्ये खूप सारे छिद्र आहे तरी सुद्धा तो पाण्याला धरून ठेवतो?
20. अशी कोणती जागा आहे जिकडे
रस्ता आहे पण गाडी नाही,
जंगल आहे पण झाड नाही, आणि
शहर आहे पण पाणी नाही?
21. असा कोण आहे जो सगळी आपली
कामे हाताऐवजी नाकाने करतो?
22. अशी कोणती गोष्ट आहे जिला
वापरण्या आधी तोडावी लागते?
23. एक अशा वस्तूचे नाव सांगा
जी तुम्हाला देण्या अगोदर तुमच्या कडून काढून घेतली जाते?
24. असे काय आहे ज्याचे येणं पण खराब आणि जाण पण खराब आहे?
25. अशी कोणती गोष्ट आहे जिला
आपण काटतो, पिसतो आणि वाटतो सुद्धा पण आपण खात नाही?
26. अशी कोणती गोष्ट आहे जिला
माणूस लपवून चालतो पण स्त्रिया दाखवून चालतात?
27. लाल गाय लाकुड खाय,
28. मातीशिवाय उगवली कपाशि लाख मन,
मुसळधार पाण्यात भिजला नाही एक कन.
28. मातीशिवाय उगवली कपाशि लाख मन,
मुसळधार पाण्यात भिजला नाही एक कन.
29. वळनावळणाची वाट मध्ये
भोगदा आहे मी
एक शरीराचा अवयव,
ओळखा पाहू मी कोण?
संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421
https://t.me/ABM4421
=============================
उत्तरे :- 1)फोन कॉल / मोबाईल 2)टेबल 3)केस
4)मेणबत्ती 5)कंगवा
6)बासरी 7)कणीस 8)वांगे
9)सायकल 10)मेहनतीचे फळ 11)आपले भाग्य 12)डोळ्याची
पापणी 13)सिंह 14) पालकांचा ओरडा किंवा मार 15)दूध 16)गुलाबजामून
17)चष्मा 18)पाणी-पुरी च्या ठेल्यावर, पाणी पुरी खाताना
आपल्याला नेहमीच वाडगा घेऊन उभा राहायला लागते. 19) स्पंज 20)नकाशा
21)हत्ती 22)अंड 23)फोटोग्राफर द्वारा तुमचा
काढलेला फोटो 24)डोळे येण पण खराब आणि जाण पण खराब आहे. 25)खळायचे पत्ते 26)पर्स
27)आग 28)ढग 29)कान