खटला
दोघां भावात जमिनीवरून तंटा निर्माण झाला. मामला
कोर्टात पोहोचला. त्यात एक भाऊ लखपती होता तर दुसरा गरीब होता. त्या दोघांना
प्रत्येकी दहा लाख रूपये वाटणीमध्ये आले होते. न्यायाधिशांनी एका भावाला
विचारले तुझ्या भावाने सात वर्षात दहा लाख रूपये कसे काय खर्च केले. श्रीमंत भाऊ
म्हणाला, माझा भाऊ प्रत्येक काम नोकराकडून करवून घेत असे.
कोणतेही काम त्याने केले नाही. नोकरही मनमानी करू लागले. एक रूपया खर्च येत असेल
तर शंभर रूपये आल्याचे दाखवत असत. तो अन्नाला महाग झाला. न्यायाधीशांनी विचारले, तुझी
श्रीमंती कशी काय टिकून राहिली. तो म्हणाला,nn माझ्या
वाडवडिलांची देणगी दिली म्हणजे मी परिश्रम करूच नये की काय, संपत्ती
मिळाल्यावरही मी परिश्रम करण्याचे सोडले नाही. मी नोकरांवर कधीच अवलंबून राहिलो
नाही. प्रत्येक कामात माझा सहभाग असल्याने नोकरांची बोलण्याची हिंमत होत नव्हती.
आता जेव्हा याच्याकडे फुटकी कवडीही उरली नाही म्हणून याने माझ्यावर दावा ठोकला
आहे. याला परिश्रम करायला नको आहेत याने स्वत:ची संपत्ती तर आळसाने घालविली आता
माझ्या संपत्तीवर याचा डोळा आहे.’’ यावर न्यायाधीश महोदयांनी इतर साक्षीपुरावे
तपासले व श्रीमंत भाऊच खरे असल्याचा निर्वाळा दिला.
तात्पर्य:- मिळालेले धन टिकवुन ठेवने कठिण असते.