⚜️ ️विद्याधन भूगोल _चला पर्यटन करू.. ⚜️
शाळा
बंद ... पण शिक्षण आहे.
==========================================
या
ठिकाणी महाराष्ट्रातील काही स्थळांवर आधारित
कोडी दिली आहेत. त्या स्थळांची उत्तरे गावांची नावे किंवा विशिष्ट ठिकाणे असतील. ती
शोधून आपल्या वहीत लिहा आणि आपल्या शिक्षकांना
तपासण्यासाठी पाठवा. यासाठी आपण आपल्या शिक्षकाची, मित्रांची, पालकांची
मदत घेवू शकता आणि आपले भाषिक ज्ञान वाढवू शकता. पाहू सर्वात प्रथम कोण शोधून
दाखवतो?....
१. दाट जंगल, उंच डोंगर, वसती
तेथे श्री शिवशंकर :------------------------
२. इथेच आणि या स्थानावर रचली गेली श्री ज्ञानेश्वरी. :------------------------
३. नौका वल्हवित जाऊया,गजाननाला
वंदूया. :------------------------
४. राष्ट्रीय पक्षाचा अभिमानगजाननाचे पवित्र स्थान. :------------------------
५. हिंदुत्त्वास्तव आत्मसमर्पण,समाधी, संगम, शंभूचे
पूजन. :------------------------
६. वीजनिर्मिती, अथांग
जलाशय.समाजमनी भूकंपाचे भय. :------------------------
७. महालातील उद्यानात करुयाआराम . :------------------------
८. जिथे वाहते गोदामैया, घडतोतिथे
रुपय्या भैया. :------------------------
९. विकलांगांचे आशास्थान, महिला
कर्तुत्वाला करूया सलाम. :------------------------
१०. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, या
उक्तीचा मराठमोळा इतिहास . :------------------------
११. आदिवासींच्या फुलवित आशा, कार्यमग्नयुगुलाचा
वैद्यकीय पेशा. :---------------------
१२. राजकारणी आदरस्थान, प्रीतीसंगमाचे
दुसरे नाम. :------------------------
१३. तोफ ऐकता विलीन झाले प्राण, राजभक्तीचे
अढळ स्थान. :------------------------
१४. कॕव्हलरी टॕंक म्युझियमची शान, नेहरू, मौलाना
झाले इथेबंदीवान. :-------------------
१५. आॕपरेशन ब्लू स्टार, प्रतिकृती
ही हुबेहूब फार. :------------------------
१६. उंच स्थान, आनंदी मन, आहे
अमुचे हे नंदनवन. :------------------------
*👉*संकलक*👈*
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421
babanauti16.blogspot.com
============================
उत्तरे :- १)भीमाशंकर, २)नेवासे, ३)ओझर व सिध्दटेक, ४०)मोरगाव,
५)वढू, ६)कोयनानगर, ७)विश्रामबाग, ८)नाशिक, ९)नगमा हुरजुक कोल्हापुर, १०)लाल महाल
पुणे, ११)बाबा आमटे आनंदवन हेमलकसा, १२)कराड, १३)पावन खिंड पन्हाळगड, १४)अहमदनगर, १५)लोणावळा,
१६)माथेरान