⚜️ *विद्याधन भाषिक
उपक्रम – शब्दसंपत्ती* ⚜️
========================================================
खाली काही शब्द समूह दिले आहेत. त्या प्रत्येक
शब्द समूहाबद्दल चार अक्षरी शब्द शोधायचा आहे. त्या प्रत्येक शब्दाच्या शेवटी ‘ळी’ हे अक्षर येते. असे शब्द शोधून आपल्या वहीत लिहा.
1. सरळ नाक असलेल्या
स्त्रीच्या नाकाची उपमा
2. दिवाळीतील तिखट
पदार्थ
3. हाताचे शेवटचे बोट
4. सरळ नाक असलेली स्त्री
5. पुरूषांच्या कानातील दागिना
6. गुपचूप बसणे
7. छोटासा फोड
8. निरागस स्त्री
9. लग्नात बांधतात ती
10. गुळाची पोळी
11. लहान बेडकी
12. जोडपे
13. अस्वस्थ स्त्री
14.जीर्ण
पर्णकुटी
*संकलक*
श्री.
बबन मोहन औटी.
पदवीधर
प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ.
शाळा जांभळी,
केंद्र
- सडे, ता. राहुरी.
जि.अहमदनगर
📞 *9421334421*
https://t.me/ABM4421
==============================================
उत्तरे :- 1)चंद्रावळी, 2)कडबोळी,
3)करंगळी , 4)चाफेकळी, 5)भिकबाळी, 6)अळीमिळी,
7)फुटकुळी, 8)साधीभोळी, 9)मुंडावळी, 10)गुळपोळी, 11)बेंडकुळी, 12)जोडगोळी,
13)चुळबुळी , 14)चंद्रमौळी