⚜️ विद्याधन भाषिक उपक्रम – समानार्थी शब्द १ ⚜️


 विद्याधन भाषिक उपक्रम – समानार्थी शब्द १ 
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
 ========================================================
खाली काही शब्द दिले आहेत. त्या प्रत्येक शब्दासाठी तीन अक्षरापेक्षा जास्त अक्षरे असलेला समानार्थी शब्द शोधायचा आहे. उत्तराच्या प्रत्येक शब्दाच्या  तिसऱ्या अक्षरावर अनुस्वार आहे. असे शब्द शोधून आपल्या वहीत  लिहा आणि आपल्या शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. यासाठी आपण आपल्या शिक्षकाची, मित्रांची, पालकांची मदत घेवू शकता आणि आपले भाषिक ज्ञान वाढवू शकता.

 उदा :-  शब्द :- न थकता
उत्तर :- अविश्रांत
1) भडका -
2) दुर्लक्ष –
3) सुंभ –
4) कालप्रवाहाचा भाग –
5) समेट –
6) नूर –
7) हकालपट्टी –
8) वाद-विवाद –
9) सलग –
10)  सदाशिव –
11)   सर्वमान्य मापक-
12)   धसमुसळा –
13)   प्रतिबंध-
14)   अनुरुप –
15)   इमानी –
16)   पोटली –
17)   फरारी –
18)   पुष्परस –
19)   नभ –
20)   कळवळा –
21)   टवळी –
22)   तुळशीचा मामा –
23)   खोडा –
24)   अव्यवस्थित कारभार-
25)   एकावर एक भांडी –
26)   उदीम –
27)   नंतर –
28)   जवळचा संबंध –
29)   मेखला –
30)   दुखावलेला –
31)   अप्रतिहत –
32)   ऋचा –
33)   अधिष्ठान –
34)   बेसुमार –
35)  गोतावळा -

संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडेता. राहुरी. जि.अहमदनगर
📞  9421334421

https://t.me/ABM4421

===========================

उत्तरे:- १)आगडोंब, २)हेळसांड, ३)दोरखंड, ४)कालखंड, ५)युध्दबंदी, ६)रागरंग, ७)अर्धचंद्र, ८)खडाजंगी, ९)एकसंध, १०)नीलकंठ, ११)मानदंड, १२)आडदांड, १३)प्रतिबंध, १४)शोभिवंत, १५)निष्ठावंत, १६)पुरचुंडी, १७)परागंदा, १८)मकरंद, १९)आसमंत, २०)अनुकंपा, २१)करवंटी, २२)इक्षुदंड, २३)कोलदांडा, २४)अनागोंदी, २५)उतरंड, २६)कामधंदा, २७)उपरांत, २८)अनुबंध, २९)कटिबंध, ३०)जायबंदी, ३१)अनिर्बंध, ३२) वेदमंत्र, ३३)अवलंब, ३४)गडगंज, ३५)भाऊबंद,गोतगंगा