⚜विद्याधन भाषिक उपक्रम – म्हणी आणि वाक्प्रचार⚜
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
=================================
या कोड्यात संकेत(क्लू)म्हणून दोन इंग्रजी
शब्द दिले आहेत त्यावरून प्रसिद्ध मराठी म्हणी वा वाक्प्रचार ओळखा व ते आपल्या
वहीत लिहा व आपल्या शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. त्यासाठी आपण आपल्या
शिक्षकांची, मित्रांची किंवा पालकांची मदत घेवू शकता.
उदा : -
इंग्रजी संकेत(क्लू) : Money , work
मराठी म्हणी वा वाक्प्रचार :- दाम करी काम
इंग्रजी संकेत(क्लू) : Money , work
मराठी म्हणी वा वाक्प्रचार :- दाम करी काम
उत्तरसूची
१. Kick , water :- लाथ मारीन तिथे पाणी काढीन.
२. Snake , hole :- आयत्या बिळात नागोबा
३. Pet animal , tail :- कुत्र्याची शेपूट वाकडीच
४. Pipe , through air :- नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे
५. Stomach , God :- आधी पोटोबा मग विठोबा
६. Taste , jaggery :- गाढवाला गुळाची चव काय
७. Sheep's life , bad taste :- शेळी जाते जीवानिशी खाणारा म्हणतो वातड
८. Dance , court-yard :- नाचता येईना अंगण वाकडे
९. Cat , witness :- उंदराला मांजर साक्षी
१०. Blind , eyes :- आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे
११. New thing , 9 :- नव्याचे नऊ दिवस
१२. Own , teeth :- आपलेच दात आपलेच ओठ
१३. Fist , amount :- झाकली मूठ सव्वा लाखाची
१४. 2 fighting , benefit :- दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ
१५. Seed , grow :- पेराल तसे उगवेल
१६. Mine , clay :- घरोघरी मातीच्या चुली
१७. Shallow , noise:- उथळ पाण्याला खळखळाट फार
१८. Roar , rain fall ? :- गर्जेल तो पडेल काय
१९. Salt , loyalty :- खाल्ल्या मिठाला जागणे
२०. Uncle , moustache :- आत्याबाईला मिश्या असत्या तर
२१. Seen God , salute :- देखल्या देवा दंडवत
२२. Neighbour , critic :- निंदकाचे घर असावे शेजारी
२३. Rabbit , hunter :- ज्याच्या हाती ससा तो पारधी
२४. Mountain , beautiful :- दुरून डोंगर साजरे
२५. Drowning , stick:- बुडत्याला काडीचा आधार
संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी.
जि.अहमदनगर
📞 9421334421