⚜ विद्याधन उपक्रम –
पानापानात दडलंय गुपीत⚜
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
=================================
या ठिकाणी काही वर्णने दिली आहेत. त्या प्रत्येक वर्णनाचे उत्तर
म्हणजे कोणत्यातरी एका वनस्पतीचे पान आहे. ते शोधून आपल्या वहीत लिहा व आपल्या
शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. त्यासाठी आपण आपल्या शिक्षकांची, मित्रांची किंवा
पालकांची मदत घेवू शकता.
उत्तरसूची
1) ह्याला विष्णूपदी स्थान = तुळस
2) ह्याला शंकरचा मान = बेल
3) इथे नागाचे स्थान = चंदन,केवडा
4) ह्याचे पान मारुतीची शान = रुई
5) जे भोजनासाठी छान = केळी
6) हे गोविंदविड्याला छान = नागवेलीचे पान
7) त्याला शकुनाचा
मान = आंबा
8) त्याच्या द्रोणपत्रावळी छान = पळसाचे पान
9) मुंजाचे स्थान = पिंपळ पान
10) काटेरी छान = केवडा, निवडुंग
11) ह्याला फोडणीतस्थान = कढीपत्ता
12) हे अळूवडीला छान = अळूचे पान
13) मसाल्याची शान = तमालपत्र
14) लिहायला छान = ताडपत्र
15) माहितीची खाण = भूर्जपत्र
16) त्यावर दवबिंदू शोभायमान = कमळाचे पान,अळू
17) सुवासिक छान त्यालाभजीतमान
= ओव्याचे पान
18) स्मरणिशक्तीला महान = शंखपुष्पी
19) त्वचेला छान = कोरफड
20) त्याला सुवर्णांचा मान = आपटा
21) तोरणाची शान = आंब्याचे
पान
संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी.
जि.अहमदनगर
📞 9421334421