⚜️विद्याधन उपक्रम - आपली राष्ट्रीय प्रतीके - सामान्यज्ञान प्रश्नावली⚜️

विद्याधन उपक्रम - आपली राष्ट्रीय प्रतीके - सामान्यज्ञान प्रश्नावली
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
=======================
  या ठिकाणी आपली राष्ट्रीय प्रतीके यावर आधारित सामान्यज्ञानाची प्रश्नावली दिली आहे, त्याची उत्तरे ते शोधून आपल्या वहीत लिहा व आपल्या शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. त्यासाठी आपण आपल्या शिक्षकांची, मित्रांची किंवा पालकांची मदत घेवू शकता.


उत्तरसूची

१) भारतीय राजमुद्रेखाली कोणते वचन आहे ?

उत्तर :-   सत्यमेव जयते.

२) १५ ऑगस्ट हा दिवस भारत देश कोणता दिवस म्हणून साजरा करतो ?

उत्तर :-   स्वातंत्र्यदिन

३) २६ जानेवारी हा दिवस भारत देश कोणता दिवस म्हणून साजरा करतो ?

उत्तर :-   प्रजासत्ताक दिन

४) भारताचा राष्ट्रध्वज कोणता ?

उत्तर :-   तिरंगा

५) भारतीय राष्ट्रध्वजावरील केसरी रंग कशाचे प्रतिक आहे ?

उत्तर :-   त्याग व शौर्या यांचे प्रतिक

६) भारतीय राष्ट्रध्वजावरील पांढरा रंग कशाचे प्रतिक आहे ?

उत्तर :-   शांतीचा संदेश.

७) भारतीय राष्ट्रध्वजावरील हिरवा रंग कशाचे प्रतिक आहे ?

उत्तर :-   समृद्धीचे प्रतिक.

८) भारतीय राष्ट्रध्वजावरील अशोक चक्र कशाचे प्रतिक आहे ?

उत्तर :-   देशाच्या प्रगतीसाठीचा संदेश.

९) भारत देशाची तीन संरक्षक दले कोणती ?

उत्तर :-   भूदल, नौदल, हवाईदल.

१०) भारताचे राष्ट्रगीत कोणते ?

उत्तर :-   जनगणमन

११) भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?

उत्तर :-   रविंद्रनाथ टागोर

१२) भारतीय राष्ट्रध्वजाचा आकार कसा आहे ?

उत्तर :-   आयताकृती

१३) कोणत्या काळात भारतीय राष्ट्रध्वज ध्वजस्तंभाच्या अर्ध्यावर उतरवतात ?

उत्तर :-   राष्ट्रीय दुखवट्याच्या काळात.





संकलक 
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर  
📞  9421334421
https://babanauti16.blogspot.com
https://t.me/ABM4421

==============================