⚜ विद्याधन इतिहास उपक्रम –
इतिहास म्हणजे काय ? ⚜
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
=================================
या ठिकाणी इतिहास म्हणजे काय? (इ.5वी) आपण असे घडलो (परिसरअभ्यास 2) या घटकावर आधारित प्रश्नावली दिली आहे, त्याची उत्तरे ते शोधून आपल्या वहीत लिहा व आपल्या
शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. त्यासाठी आपण आपल्या शिक्षकांची, मित्रांची किंवा
पालकांची मदत घेवू शकता.
उत्तरसूची
1) भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात?
उत्तर :- इतिहास
2) इतिहास
केवळ ----------- आधारे लिहिला जात नाही.
उत्तर :- कल्पनेच्या
3) प्रत्येक
शास्त्राचा स्वत:चा
------------ असतो.
उत्तर :- इतिहास
4) ‘भूतकाळातील
कृतींवर भविष्यकाळ अवलंबून असतो.’ हे आपण
--------- च्या अभ्यासातून शिकतो.
उत्तर :- इतिहासाच्या
5) मानवाच्या
शारीरिक आणि बौध्दिक विकासाच्या जोडीनेच त्याचे ------------ विकसित
होत गेले.
उत्तर :- तंत्रज्ञानही
6) --------------
शोधांच्या आधारानेच मानवाला नवनवीन शोध लावणे शक्य असते.
उत्तर :- भूतकाळातील
7) इतिहासाची
भौतिक साधने कोणती ?
उत्तर :- नाणी,किल्ले, ताम्रपट, भांडी,वाडे, लेणी, शिलालेख, हत्यारे, स्तंभ, राजमुद्रा, हाडे
8) इतिहासाची
लिखित साधने कोणती ?
उत्तर :- पत्रव्यवहार, चरित्रग्रंथ, हस्तलिखिते
9) इतिहासाची
मौखिक साधने कोणती ?
उत्तर :- जात्यावरील, ओव्या, लोकगीते,
लोककथा
10)
इतिहास कोणाचा असतो ?
उत्तर :- इतिहास हा मानवी संस्कृतींचा, माझा, शाळेचा, गावाचा, जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा, आणि जगाचा असतो.
11)
कोणत्याही शास्त्राचे वैषिष्ट्ये कोणते असते ?
उत्तर :- कोणताही
पुरावा
प्रत्यक्ष
प्रयोगांच्या
कसोट्यांवर
पुन्हा
पुन्हा
तपासून
पाहता
येणे,
हे
कोणत्याही
शास्त्राचे
वैषिष्ट्य
असते.
12)
‘शास्त्रीय पध्दत’ म्हणजे
काय ?
उत्तर :- प्रत्येक
पुरावा
वेगवेगळ्या
कसोट्यांवर
तपासून
तो
विश्वास
ठेवण्याजोगा
आहे
की
नाही,
हे
ठरवण्याच्या
पद्धतीला
‘शास्त्रीय
पध्दत’
असे
म्हणतात.
13)
इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण कोणत्या तीन
प्रकारात केले जाते ?
उत्तर :- इतिहासाच्या
साधनांचे
वर्गीकरण
भौतिक
साधने,
लिखित
साधने
आणि
मौखिक
साधने
अशा
तीन
प्रकारांत
केले
जाते.
14)
पर्यावरणशास्त्रात कोणता अभ्यास केला जातो ?
उत्तर :- पर्यावरणाची
हानी,
प्रदुषण
यांसारख्या
समस्या
आणि
त्यांवरचे
उपाय
यांचा
अभ्यास
पर्यावरणशास्त्रात
केला
जातो.
15)
इतिहासाच्या अभावामुळे कोणती गोष्ट शक्य
होते ?
उत्तर :- इतिहासाच्या
अभ्यासामुळे
मानवी
समाजाच्या
प्रगतीसाठी
इष्ट
काय
आणि
अनिष्ट
काय,
यांचा
अभ्यास
करणे
शक्य
होते.
16)
स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना कोणत्या कृतीचा
परिणाम आहे ?
उत्तर :- स्वातंत्र्यप्राप्ती
ही
घटना
आपला
स्वातंत्र्यलढा
या
कृतीचा
परिणाम
आहे.
17)
गावाच्या विकासात अडथळे केंव्हा निर्माण
होतात ?
उत्तर :- गावातील
लोकांमध्ये
काही
कारणाने
एकजूट
झाली;
तर
गावाच्या
विकासात
अडथळे
निर्माण
होतात.
18)
प्रत्येक गावाचा विकास केंव्हा होईल ?
उत्तर :- जेंव्हा
गावातील
लोक
एकजुटीने
आणि
एकमेकांच्या
साहाय्याने
सगळी
कामे
पार
पाडतील,
तेंव्हा
गावाचा
उत्तम
रितीने
विकास
होईल.
19)
प्रत्येक शास्त्राच्या इतिहासातून आपल्याला
कोणती माहिती मिळते ?
उत्तर :- प्रत्येक
शास्त्राच्या
इतिहासातून
आपल्याला
मानवी
संस्कृतीत
महत्वाचे
बदल
घडवून
आणणाऱ्या
अनेक
शास्त्रीय
शोधांची
आणि
ते
शोध
लावणाऱ्या
शास्त्रज्ञांची
माहीती
मिळते.
20)
इतिहासाची मांडणी करताना शास्त्रीय पध्दतीचा
वापर केंव्हा केला जातो ?
उत्तर :- इतिहासाची
मांडणी
करताना
त्या
घटनेतील
पुरावा
शोधण्यासाठी,
तपासण्यासाठी
आणि
जुळवण्यासाठी
शास्त्रीय
पध्दतीचाच
वापर
केला
जातो.
संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी.
जि.अहमदनगर
📞 9421334421