⚜️दारिद्र्य आणि व्यक्ति⚜️
एकदा एका व्यक्तीवर त्याच सौख्य(भाग्य) रुसल आणि जाता
जाता त्याला म्हणाल आता माझ्या जागी तुझ्या घरात दारिद्र्य येणार आहे. परंतु तू एक
उत्क्रुष्ट व्यक्ती असल्याने. मी तुला एक वरदान मागण्याची संधी देत आहे. तुझी
इच्छा असेल तर कोणतही वरदान तू मागु शकतोस. माणूस खूप समजदार होता, तो म्हणाला
जर दारिद्र्य येणारंच असेल तर त्याला कोणी थांबवू शकत नाही, बस्स फक्त
त्याला म्हणावं माझ्या परिवारात एकमेकांत प्रेम आणि जिव्हाळा कायमस्वरूपी राहू
दे.. सौख्य तथास्तु म्हणाल आणि निघून गेल.
काही
दिवसानंतर - धाकटी सून स्वयंपाक बनवत होती, तिनं भाजीला
मीठमसाला टाकला आणि दुसऱ्या कामात गुंतली.. त्यानंतर मोठी सून आली, तीनं भाजी न
चाखताच मीठ टाकलं, आणि दुसऱ्या कामाला घराबाहेर निघून गेली.
त्याचप्रमाणे आणखी दोन सुनांनी न चाखताच भाजीत मीठ टाकलं आणि निघून गेल्या. जेव्हा
कुटूंबप्रमुख व्यक्ती आला. आणि जेवायला बसला तर भाजी इतकी खारट होती की. त्याला ती
जिभेवर ठेऊ वाटेना. परंतु तो समजून गेला की. दारिद्र्याने आपल्या घरात प्रवेश
केलेला आहे. त्यानं काही न बोलता जेवण केलं आणि निघून गेला. त्या नंतर मोठा मुलगा
जेवायला बसला, तेव्हा खारट लागल्या नंतर त्याने विचारलं? बाबांनी
जेवण केलं का? तेव्हा बायकोनं हो म्हटलं. नंतर त्यानं विचार
केला. जेव्हा वडील काही बोलले नाही तर मी कशाला बोलू? त्याचप्रमाणे परिवारातल्या सगळ्या सदस्यांनी
एकमेकां विषयी विचारलं आणि काही न बोलता सर्वांनी जेवण केलं. संध्याकाळी दारिद्र्य
त्या व्यक्तीसमोर आलं आणि म्हणालं मी निघून चाललो आहे. माणूस म्हणाला कां? तू तर
स्वःइच्छेने आलास. अन आता लगेच निघालास अस का. ? दारिद्रय
म्हणालं, तुम्ही लोकांनी किलोभर मीठ खाल्लं ... तरीपण भांडणं
केले नाहीत. ज्या घरात इतक्या खारटपणानंतरही तुमची गोडी कमी झाली नाही, ज्या घरात
भांडणं होत नाही. त्या घरात मला मुळीच करमत नाही. मी अशा घरात राहुच शकत नाही.
जातो मी आता.
तात्पर्य:- भांडण आणि इर्षा यामुळं आपलच नुकसान होतं.
ज्या घरात प्रेम, शांती, आणि आपुलकी
असते तिथं भाग्य, सौख्य. आनंद, समाधान.
रेलचेल, नेहमी नांदत असते.