⚜️विद्याधन भाषिक उपक्रम – खाद्यपदार्थ⚜️

विद्याधन भाषिक उपक्रम – खाद्यपदार्थ
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
=================================
या ठिकाणी काही वाक्ये दिली आहेत. प्रत्येक वाक्यात एक खाद्य पदार्थ लपलेला आहे,खाद्य पदार्थ शोधून आपल्या वहीत लिहा आणि आपल्या शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. यासाठी आपण आपल्या शिक्षकाचीमित्रांचीपालकांची मदत घेवू शकता आणि आपले खाद्यपदार्थ विषयी ज्ञान वाढवू शकता.

उदा. :-

वाक्य  :- पॅचवर्क साडीचे व्हि.टी स्टेशन जवळ मोठे दुकान आहे.

उत्तर :-  पॅटीस



1) भडोच मधून साबरमती नदी वहाते.

उत्तर :-  ------------

2) उभे किती वेळ रहाणार बसा घडीभर.

उत्तर :-  ------------

3) गुड! गुड! दाणी बाई नेहमी असा शेरा द्यायच्या.

उत्तर :-  ------------

4) आपण सगळे मिळून कोडे सोडवूयात का?

उत्तर :-  ------------

5) संकटाला सामोरे जायला सामान्य माणूस घाबरत नाही.

उत्तर :-  ------------

6) भरत वाक्य म्हंजी काय रे भाऊ

उत्तर :-  ------------

7) टिचभर फक्की मैदानावर मारून काही उपयोग नाही

उत्तर :-  ------------

8) आपोआप अँडमिशन कशी मिळेल हे कळत नाही पोरांना

उत्तर :-  ------------

9) सांजवात लावली की अजाणता हात जोडले जातात.

उत्तर :-  ------------

10) उपदिशा किती आहेत काही माहिती आहे का?

उत्तर :-  ------------

11)  गाडी साइडला घेतली की मग मोबाईलवर बोला.

उत्तर :-  ------------

12)  कालच नाजनीन आली मला ती भटुरड्या राजा म्हणते.

उत्तर :-  ------------

13) पावशेर भात आजी किती जणांना पुरेल?

उत्तर :-  ------------

14) टोळक्यांची स्टंटबाजी अजिबात खपवून घेऊ नका.

उत्तर :-  ------------

15) रो मत बेटी नानानानी आएंगे जल्दी.

उत्तर :-  ------------

16) समिहा आज सकाळपासून गप्प गप्प आहे.

उत्तर :-  ------------

17) शिस्तच लावायची तर थोरामोठ्यां पासून सुरूवात करा

उत्तर :-  ------------

18) अवस पौर्णिमेला चांगल्या वाईट घडामोडी घडत असतात.

उत्तर :-  ------------

19) मॅडी ,म्हणजे 'मंदोदरीम्हणजे आपल्या गीताची मैत्रिण आहे बरं 
का.

उत्तर :-  ------------

20) 'थोरातांची कमळामधील सवाल जबाब एकदम सही आहेत

उत्तर :-  ------------

संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडेता. राहुरी. जि.अहमदनगर
📞  9421334421


=========================================
उत्तरसूची