⚜विद्याधन परिसर अभ्यास उपक्रम – सामान्यज्ञान प्रश्नावली⚜
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
=======================
या ठिकाणी परिसर अभ्यासावर आधारित प्रश्न दिले आहेत. त्या प्रश्नांची तीन योग्य उत्तरे शोधून आपल्या वहीत लिहा व आपल्या शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. त्यासाठी आपण आपल्या शिक्षकांची, मित्रांची किंवा पालकांची मदत घेवू शकता.
उत्तरसूची
(१) पाय नसणा-या प्राण्यांची नावे सांगा ?
उत्तर - साप, गांडूळ, मासा.
(२) सजीवांची नावे सांगा.
उत्तर - गाय, माणूस, झाड.
(३) निर्जीवांची नावे सांगा.
उत्तर - दगड, माती, गाडी.
(४) कीटकांची नावे सांगा.
उत्तर - डास , फुलपाखरू, मधमाशी.
(५) सरपटणारे प्राणी सांगा.
उत्तर - साप, गोगलगाय, सरडा.
(६) जलचर प्राण्यांची नावे सांगा.
उत्तर - मासा, बेडूक, खेकडा.
७) घरात दिसणा-या प्राण्यांची नावे सांगा.
उत्तर - झुरळ, मुंग्या, पाल.
(८) मसाल्याच्य पदार्थांची नावे सांगा.
उत्तर - मोहरी, जीरे, हळद .
(९) सुकामेवा पदार्थांची सांगा.
उत्तर - बदाम, काजू , खारीक.
(१०) अन्न पदार्थांची नावे सांगा.
उत्तर - भाकरी, भात, भाजी.
(११) कंदभाज्यांची नावे सांगा.
उत्तर - मुळा, गाजर, सुरण.
( १२) मुख्य ॠतूंची सांगा.
उत्तर - उन्हाळा, पावसाळा, हिवाळा.
(१३) चवींची नावे सांगा ?
उत्तर - गोड , कडू , खारट.
(१४) वाहनांची नावे सांगा.
उत्तर - बस, आगगाडी, विमान.
(१५) रंगांची नावे सांगा.
उत्तर - लाल, काळा, पांढरा .
(१६ ) सणांची नावे सांगा.
उत्तर - होळी, नाताळ, ईद .
(१७) खेळांची नावे सांगा.
उत्तर - कबड्डी, क्रिकेट, लंगडी.
(१८) धान्याची नावे सांगा.
उत्तर - गहू, बाजरी, ज्वारी.
(१९) रोगांची नावे सांगा.
उत्तर - ताप, सर्दी, खोकला.
(२०) दागिण्यांची नावे सांगा.
उत्तर - पैंजण, नथ, साखळी.
(२१) धातूंची नावे सांगा.
उत्तर - सोने, लोखंड, तांबे.
(२२) हत्यारांची नावे सांगा.
उत्तर - कु-हाड, सुरी, कोयता.
संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421