⚜विद्याधन
परिसर अभ्यास (नागरिकशास्र ) उपक्रम – कुटुंबातील मुल्ये प्रश्नावली⚜
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
=======================
या ठिकाणी ५. कुटुंबातील मुल्ये (पाचवी नागरिकशास्र) या पाठावर आधारित प्रश्न दिले आहेत.
त्या प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय प्रश्नाखाली दिलेल्या पर्यातून शोधून आपल्या वहीत लिहा व आपल्या
शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. त्यासाठी आपण आपल्या शिक्षकांची, मित्रांची किंवा पालकांची मदत घेवू
शकता.
उत्तरसूची
1] रिक्षात सापडलेली पिशवी समुने
जवळच्या पोलीस चौकीत जमा केली .
1) योग्य 2) अयोग्य
2] आपण फक्त कुटुंबातील सदस्यांनाच मदत
केली पाहिजे.
1) योग्य 2) अयोग्य
3] आरतीने मीनूकडून घेतलेली पेन्सिल
लिहून झाल्यावर तिला परत केली.
1) अयोग्य 2) योग्य
4] सायकलवरून पडलेल्या सीताने तिला
नेहाने पाडले असे आईला सांगितले.
1) अयोग्य 2) योग्य
5] रिक्षात सापडलेली पिशवी राम ने जवळच्या पोलिस चौकीत जमा केली.
1) अयोग्य 2) योग्य
6] प्रामाणिकपणा आपल्याला ....बनवतो.
1) निर्भय 2) भित्रा
7] प्रामाणिकपणा हि आपली .....असते
1) समस्या 2)
मजबुरी 3) ताकद
8] आपल्या देशात........... वृत्तीला
विशेष महत्त्व आहे.
1) कामचुकार 2) सहिष्णू 3) गर्विष्ठ 4) असहिष्णू
9] .......... ही सामाजिक सलोख्याची
पहिली पायरी आहे.
1)
सहिष्णुता 2) समानता 3) श्रेष्ठता 4) प्रामाणिकपणा
10] आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर
करणे म्हणजे......
1) निर्भय 2)
उपकार 3) प्रगती 4) सहिष्णुता
11] प्रामाणिकपणा ही आपली
.........असते.
1)
ताकद 2) सवय 3) गरज 4) समस्या
12] सामाजिक जीवनात सर्वांना
...............गरज असते.
1) मदतीची 2) सहकार्याची 3) पैशाची 4) घराची
13] आपल्या देशात ............वृत्तीला
विशेष महत्त्व आहे.
1) धर्म 2) सहिष्णुता 3) भेदभाव 4) अप्रमाणिकपणा
14] समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे
सर्वांना ..............करता येते.
1) सहकार्य 2) प्रगती 3) मदत 4) विचार
15] प्रामाणिकपणा आपल्याला
.......बनवतो.
1)
निर्भय 2) श्रेष्ठ 3) विश्वासू
16] विविधतेचे जतन ........होते.
1) संघर्षामुळे 2) सहकार्यामुळे 3) सहिष्णुतेमुळे
17] ......... ही सामाजिक सलोख्याची
पहिली पायरी आहे
1) सहिष्णुता 2) समानता 3) प्रामाणिकपणा
18] सर्व स्त्री-पुरुषांना
.........समान संधी मिळाली पाहिजे
1) प्रगतीची 2) विविधतेची 3) सहिष्णुतेची
19] सहिष्णुता हि सामाजिक सलोख्याची
पहिली पायरी आहे
1) सत्य 2) असत्य
20] सामाजिक जीवनात सर्वाना सहकार्याची गरज नसते
1) सत्य 2) असत्य
21] कुटुंबात सर्वांचा आदर केला पाहिजे
1) सत्य 2) असत्य
22]
रस्ता चुकलेला मुलगा तुम्हाला भेटला तर
1) त्याला चुकीचा
मार्ग दाखवाल
2) त्याच्याकडे
दुर्लक्ष कराल
3) त्याला त्याचा योग्य मार्ग दाखवाल
23] आपल्यावरील उपकाराची जाणीव ठेवणे
म्हणजे
1) कृतज्ञता 2) कृतघ्नता
24] कोणती मुल्ये आपल्याला समृद्ध बनवतात
1) आज्ञाधारकता 2) संवेदनशीलता
3) प्रामाणिकपणा
4) सर्व पर्याय
बरोबर
25] कुटुंबातील निर्णय घेण्यात सहभागी होता
आल्याने काय होत नाही?
1) आपल्याला काय वाटते, हे सांगण्याची प्रत्येकाला संधी मिळते.
2) एकमेकांना विचारून निर्णय
घेतल्याने त्या विषयावर चर्चा होऊन सर्व बाजू समजतात.
3) घरात आपल्या मताला
महत्त्व दिले जात आहे, हे पाहून
आपल्याला कुटुंबाबद्दल अधिक जवळीक वाटू लागते.
4) सर्वांनी मिळून एकमताने निर्णय घेतल्याने
कुटुंबाचे अहित होते.
26] पुढील प्रसंगातील कोणाचे वागणे
अप्रामाणिकपणाचे आहे? 1/1
1) आरिफने मोनूकडून
पेन्सिल मागितली. लिहून झाल्यावर त्याने पेन्सिल परत केली.
2) शाळेतून घरी येताना शर्मिला सायकलवरून पडली.
आईला सांगताना मात्र तिने 'स्नेहाने माझी
सायकल ढकलली, म्हणून मी पडले', असे सांगितले.
3) दुचाकीवरून जाणाऱ्या
व्यक्तीची कागदपत्रांची पिशवी जॉनने जवळच्या पोलीस चौकीत जमा केली.
4) दोन दिवसांपूर्वी वयाची १२ वर्षे पूर्ण झालेल्या
समीरने बसमधून प्रवास करताना वाहकाला पूर्ण तिकीट मागितले.
27] एखादी चूक झाल्याचे लक्षात आल्यास त्याविषयी
आई वडिलांशी, भावंडांशी व मित्रमैत्रिणींशी
मोकळेपणाने बोलावे कारण •••••••
1) त्यातून आपल्याला झालेली चूक सुधारण्याची
संधी मिळते आणि आपला प्रामाणिकपणा दिसून येतो.
2) पुन्हा चूक करण्याची
संधी मिळते.
3) त्यांचा आपल्यावरील
विश्वास कमी व्हावा.
आपण कोणालाही घाबरत नाही
हे दाखवता यावे.
28]••••• वागल्यास आपला आत्मविश्वास कमी होतो.
1) प्रामाणिकपणे 2)
अप्रामाणिकपणे
3) शिस्तबद्ध 4) सत्यप्रिय
29] •••••
सार्वजनिक जीवनातील कार्यक्षमता वाढते.
1) लबाडीमुळे 2) फसवणुकीमुळे
3) अप्रामाणिकपणामुळे 4) प्रामाणिकपणामुळे
30] ••••• कोणतेही काम यशस्वीपणे पार पडते.
1) परस्पर असहकार्याने 2) परस्पर सहकार्याने
3) परस्पर संघर्षाने 4) परस्पर द्वेषाने
31] रस्ता चुकल्याने ५ वर्षांचा रडत असलेला
मुलगा तुम्हाला भेटला, तर खालीलपैकी कोणती कृती
करण्याचे तुम्ही टाळाल?
1) त्याला त्याचा पत्ता
नीट सांगता येत नसेल तर त्यास जवळच्या पोलीस चौकीत नेऊन पोलीसांना माहिती द्याल.
2) त्याला त्याच्या
बाबांचा मोबाईल नंबर सांगता येत असल्यास जवळच्या सार्वजनिक फोन बुथवरून त्याच्या
बाबांना फोन करून मुलाबाबत कल्पना द्याल.
3) मुलाकडे दुर्लक्ष करून तिथून लगेच निघून
जाल.
4) मुलाला धीर देऊन
त्याला त्याचा पत्ता नीट सांगता आल्यास व ते ठिकाण तुमच्या परिचयाचे असल्यास
मुलाला त्याच्या घरी सोडाल.
32] चुकीचे विधान ओळखा.
1) आपल्यापेक्षा वेगळ्या
मतांचा आदर करणे म्हणजे सहिष्णुता.
2) सहिष्णुतेमुळे
विविधतेचे जतन करता येते.
3) सहिष्णुता ही सामाजिक
सलोख्याची पहिली पायरी आहे.
4) सामाजिक समस्यांच्या निराकरणासाठी
सहिष्णुतेची आवश्यकता नसते.
33] सर्व स्त्री-पुरुषांना प्रगतीची
••••• संधी मिळाली पाहिजे.
1) वेगळी 2) समान
3) भिन्न 4) निराळी
34] प्रामाणिकपणा ही आपली काय असते ?
1) ताकद 2)कमजोरी 3) विश्वास 4) व्यसन
35] सार्वजनिक जीवनात सर्वांना कशाची
गरज असते ?
1) सहकार्याची 2) अंधविश्वासाची 3) श्रेष्ठतेची 4) अहंकाराची
36] समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे
सर्वांना काय करता येते?
1) प्रवास 2) प्रगती 3) प्रवचन 4)
यात्रा
37] प्रामाणिकपणा आपल्याला काय बनवतो ?
1) श्रेष्ठ 2) शत्रु 3) अविश्वासू 4) निर्भय
38] सहिष्णूतेमुळे कशाचे जतन होते ?
1) विविधतेचे 2) कामगारांचे 3) पर्यावरणाचे 4) काही लोकांचे
39] सर्व स्त्री-पुरुषांना कशाची समान
संधी मिळाली पाहिजे?
1) सहकार्याची 2) सहलीची 3) प्रगतीची
4) पर्यटनाची
40] प्रामाणिक व्यक्तींबद्दल सर्वांनाच
काय वाटतो ?
1) काळजी 2) हेवा 3) राग 4) आदर
41] प्रामाणिकपणा आपल्याला काय बनवितो ?
1) आळशी 2) स्वार्थी 3) निर्भय
4) वाईट
43] खेळात कोणती भावना महत्वाची असते ?
1) सहकार्याची भावना 2) खेळाची भावना
3) मदतीची 4)
भांडण्याची भावना
44] सहिष्णुता म्हणजे काय ?
1) स्वतःचा
मोठेपणा मिरवणे
2) स्वतःबद्दल
विचार करणे
3) आपल्यापेक्षा वेगळ्या मताचा आदर
करणे
4) दुसऱ्यांचे
विचार तुच्छ मानणे.
45] सामाजिक सलोख्याची पहिली पायरी
कोणती ?
1) सहिष्णुता 2) प्रामाणिकपणा 3) विकास 4) गरजा
46] स्त्री पुरुष समानता म्हणजे काय ?
1) मुलगा मुलगी
दोघांनाही समान वागवणे
2) भेदभाव करणे
3) एकाचाच विचार
करणे
47] आपण कोठे एकत्र राहतो.
1) समाजात 2) कुटुंबात 3) गावात 4)
शहरात
48] सविता आणि समीर या तुमच्या
मित्र-मैत्रिणीच्या स्वभावातील पुढील पैकी ज्या बाबी तुम्ही स्विकारल्या बरोबर व
चूक अशी खूण करा:१) समीर खोडकर आहे
1) बरोबर 2) चूक
49] सविता आणि समीर या तुमच्या
मित्र-मैत्रिणीच्या स्वभावातील पुढील पैकी ज्या बाबी तुम्ही स्विकारल्या बरोबर व
चूक अशी खूण करा:२) सविता छान विनोद सांगते
1) बरोबर 2) चूक
50) सविता आणि समीर या तुमच्या
मित्र-मैत्रिणीच्या स्वभावातील पुढील पैकी ज्या बाबी तुम्ही स्विकारल्या बरोबर व
चूक अशी खूण करा:३) सविता वेळेवर अभ्यास करीत नाही
1) बरोबर 2) चूक
संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक
शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा
जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी.
जि.अहमदनगर
📞 9421334421