⚜️कावळा चिमणी⚜️
कावळा चिमणीचा शेजारी. कावळ्याचं घरं शेणाचं, चिमणीचं घर मेनाचं. पाऊस झाला, कावळ्याचं घर गेलं वाहून, तो गेला चिमणीकडे धावून. चिमणी पिलातचं होती व्यस्त, कावळा भिजभिजला मस्त. दिवस गेला , महिने गेले , वर्षे गेली. चिमणीचे पिलू भरारी घेऊन गेलं परदेशी. त्याच्या आठवणीनं चिमणी रोज रडे, फोटो त्याच्या घेऊन उशाशी. पिल्लू परदेशातून पैसे पाठवी , चिमणीला पिलूचं हवे होतं , पैसे नको म्हणून खर्च न करता नुसतेच साठवी ...!चिमणी अखेर आजारी पडली , तेव्हा कोणी नाही आले धावून. शेवटी कावळ्यानेच मदत केली, तर चिमणीचे डोळे गेले अश्रूंनी वाहून. कावळा म्हणाला चिमणीला, "विचार करु नको फार, लक्षात ठेव मात्र, घरासोबत जोडावे मित्रही चार.
तात्पर्य:- मित्र जर असतील पक्के, त्यांच्यासोबत काढता येते, आपले आयुष्य अख्खे.