⚜️विद्याधन भाषिक उपक्रम – शब्दसंपत्तीवर प्रभुत्व⚜️
शाळा बंद...पण शिक्षण आहे.
==================
या ठिकाणी काही शब्द दिले आहेत. दिलेल्या शब्दांचे अर्थ तुम्हाला शोधायचे आहे. येणारे उत्तर सहा अक्षरी आहे. तसेच उत्तरात एक अक्षर किंवा अक्षर समूह परत आलेले आहेत. असे शब्दांचे अर्थ शोधून आपल्या वहीत लिहा आणि आपल्या शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. यासाठी आपण आपल्या शिक्षकाची, मित्रांची, पालकांची मदत घेवू शकता आणि आपले भाषिक ज्ञान वाढवू शकता.
उदा:-
१) शब्द :- तलम
उत्तर :- मऊमुलायम
दोन वेळेस आलेले अक्षर/ अक्षरसमूह :- म
२) शब्द :- दोष लपविणे
उत्तर:- सारवासारव
दोन वेळेस आलेले अक्षर/ अक्षरसमूह :- सार
१) बेढब
उत्तर :- ओबडधोबड
२) वहिवाट
उत्तर :- दळणवळण
३) देवघेव
उत्तर :- देवाणघेवाण
४) देऊ करणे
उत्तर :- आदानप्रदान
५) दोष काढणे
उत्तर :- उखाळीपाखाळी
६) पंचाईत करणे
उत्तर :- ढवळाढवळ
७) उदो
उत्तर :- जयजयकार
८ हलणारा
उत्तर :- लटलटणारा
९) कंपित
उत्तर :- थरथरणारा
१०) काल्पनिक
उत्तर :- कपोलकल्पित
११) किरकोळ
उत्तर :- किडुकमिडुक
१२) मामुली
उत्तर :- बारीकसारीक
१३) मन रमविणे
उत्तर :- ख्यालीखुशाली
१४) धामधूम
उत्तर :- गजबजलेला
१५) परंपरेने चालणारा
उत्तर :- गतानुगतिक
१६) येरझारा
उत्तर :- गमनागमन
१७) चरितार्थ
उत्तर :- उदरभरण
१८) पुनरूक्ती
उत्तर :- चर्वितचर्वण
१९) चालढकल
उत्तर :- टोलवाटोलवी
२०) टाळाटाळ
उत्तर :- टंगळमंगळ
२१) खुशामत
उत्तर :- लांगूलचालन
२२) समयसूचक
उत्तर :- हजरजबाबी
२३) उपद्व्याप
उत्तर :- उलटसुलट
२४) डावे उजवे
उत्तर :- सव्यापसव्य
२५) सुरक्षित
उत्तर :- सहीसलामत
२६) फुटकळ
उत्तर :- लहानसहान
२७) अंदाज
उत्तर :- जवळजवळ
२८) शुल्लक
उत्तर :- सटरफटर
२९) अराजक
उत्तर :- बजबजपुरी
३०) घोटाळा
उत्तर :- अफरातफर
३१) रेटा
उत्तर :- ढकलाढकली
३२) बेईमान
उत्तर :- नमकहराम
३३) हातोहात
उत्तर :- हस्तेपरहस्ते
३४) कोणी एक
उत्तर :- अमकातमका
३५) पूर्वापार
उत्तर :- परंपरागत
३६) जवळच
उत्तर :- इकडेतिकडे
३७) स्पर्धा
उत्तर :- अहमहमिका
३८) कसेबसे
उत्तर :- थातूरमातूर
३९) प्रत्यक्ष
उत्तर :- उघडउघड
४०) पद्मकर्कटी
उत्तर :- कमळकाकडी
४१) तुच्छता
उत्तर :- हिडीसफिडीस
४२) जोराचे भांडण
उत्तर :- हमरीतुमरी
४३ जीर्ण
उत्तर :- मोडकातोडका
४४) खल
उत्तर :- खंडनमंडन
४५) निरूत्साही
उत्तर :- रडतराऊत
४६) सरदार
उत्तर :- जहागीरदार
संकलक व निर्मिती
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421
https://babanauti16.blogspot.com