⚜️विद्याधन भाषिक उपक्रम – शब्दसंपत्तीवर प्रभुत्व⚜️


 विद्याधन भाषिक उपक्रम – शब्दसंपत्तीवर प्रभुत्व
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
======================
या ठिकाणी काही संक्षिप्तरुपात म्हणी दिल्या आहेत. त्या म्हणी शोधून आपल्या वहीत लिहा आणि आपल्या शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. यासाठी आपण आपल्या शिक्षकाची, मित्रांची, पालकांची मदत घेवू शकता आणि आपले भाषिक ज्ञान वाढवू शकता.

उत्तरसूची 

१) ज्या गा बो त्या गा बा

उत्तर :- ज्या गावच्या बाभळी त्या गावच्या बोरी

२) ना सो हा क वा ना

उत्तर :- नाव साोनूबाई हाती कथलाचा वाळा

३) खि ना द ब कों

उत्तर :- खिशात नाही दमडी बदलली कोंबडी


४) ना मो ज

उत्तर :- नाकापेक्षा मोती जड

५) मू ल कि म

उत्तर :- मुर्ति लहान किर्ती महान

६) उ जी ला टा

उत्तर :- उचलली जीभ लावली टाळ्याला

७) सा सं ये घ तो दि द

उत्तर :- साधु संत येती घरा तोची दिवळी दसरा

८) ए सा क अ ध सु

उत्तर :- एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ

९) दु डों सा

उत्तर :- दुरून डोंगर साजरे

१०) आ तो बा दु ते का

उत्तर :- आपला तो बाब्या दुसर्याचे ते कार्ट

११) गा वा गी रा गों ब हो

उत्तर :- गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता

१२) गा मे ओ शिं मे हे

उत्तर :- गाढव मेलं ओझ्याने, शिंगरू मेलं हेलपाट्याने.

संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞  9421334421