⚜विद्याधन मराठी उपक्रम – प्रश्नावली⚜
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
=======================
या ठिकाणी २.बंडूची इजार (पाचवी मराठी) या पाठावर आधारित प्रश्न दिले आहेत. त्या प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय प्रश्नाखाली दिलेल्या पर्यातून शोधून आपल्या वहीत लिहा व आपल्या शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. त्यासाठी आपण आपल्या शिक्षकांची, मित्रांची किंवा पालकांची मदत घेवू शकता.
प्रश्नावली
१) बंडूचे कुटुंब कसे होते ?
१) आळशी २) कामचुकार
३) आज्ञाधारक ४) सांगितलेले करणारे
२) धोंडूमामानी कपडे शिवले खरे पण अंदाज चुकला असे का म्हटले आहे?
१) धोंडूमामानी कपडे बरोबर शिवले २) धोंडूमामानी कपडे चांगले शिवले
३) धोंडूमामानी इजार आखूड शिवली ४) धोंडूमामानी इजार लांब शिवली
३) कॉलेजला कोणाला जायचे होते ?
१) आई २) बायको ३) सुबा ४) धोंडूमामा
४) इजार बाबत चूक लक्षात कधी आली ?
१) बंडू शेतात गेल्यावर २) बंडूने सकाळी इजार घातल्यावर
३) बंडूने संध्याकाळी इजार घातल्यावर ४) दुपारी
५) बंडूचा स्वभाव कसा नव्हता ?
१) शांत २) कष्टाळू
३) आपण भल आणि आपल काम भलं ४) रागीट
६) बंडूने शेवटी कोणाला सांगितले ?
१) बहिणीला २) आईला
३) बायकोला ४) धोंडूमामांना
७) इजार किती जणांनी कापली ?
१) ४ २) ३
३) ४ ४) १
८) सगळे कशी हसू लागले ?
१) इजारीतला बंडू पाहून २) चड्डीतला उघडे पाहून
३) चड्डीतला बंडू पाहून ४) चड्डीतला सदरा घातलेला पाहून
९) इजार लांब झाली यात चूक कोणाची ?
१) आई २) बायको
३) सुबा ४) धोंडूमामा
१०) बंडू हिरमुसला होऊन शेतात गेला म्हणजे काय झाले ?
१) बंडू खुश झाला २) बंडू नाराज झाला
३) बंडू रडू लागला ४) बंडू नाचू लागला
११) बंडूचा स्वभाव कसा होता?
१) शांत २) धाडसी
३) तिरसट ४) रागीट
१२) बंडू चे गाव कोणते होते?
१) कराची २) बावडा
३) मुळशी ४) बावची
१३) बंडू दिवसभर कोठे असायचा?
१) शेतात २) घरी ३) कट्ट्यावर ४) गावात
१४) बंडू सायंकाळी घरी आल्यावर कोणाशी खेळत असे?
१) मुलीबरोबर २) ताईबरोबर
३) मुलांबरोबर ४) मित्रांबरोबर
१५) दिनक्रम म्हणजे काय?
१) दिवस-रात्र २) दिवसाचे काम
३) सकाळी ४) दिवसाचा क्रम
१६) बंडूला कपडे कोणी शिवून दिले?
१) गणू मामा २) धोंडू मामा ३) गुंडू मामा ४) पांडू मामा
१७) बंडूने स्वतःसाठी काय शिवले?
१) धोतर २) शर्ट ३) इजार ४) जाकीट
१८) इजार चार बोट लांब झाल्यावर कमी करण्यासाठी बंडू सुरुवातीला कोणाकडे गेला?
१) बहिणीकडे २) धोंडू मामा कडे
३) बायकोकडे ४) आईकडे
१९) सुबाने बंडू चे काम का केले नाही?
१) तिला कॉलेजला जायचं होतं. २) तिला वैरण आणायची होती.
३) तिला जेवण करायचं होतं. ४) तिला भांडी धुवायची होती.
२०) बंडूच्या बायकोने इजार कमी करण्यासाठी नकार का दिला?
१) तिला वैरण आणायची होती. २) तिला शिवता येत नव्हते.
३) तिला जेवण करायचे होते. ४) तिला कपडे धुवायची होती.
२१) बंडूच्या आईचे हात कशाने दुखत होते?
१) घरी बसून २) कपडे धुऊन
३) वैरण कापून ४)जेवण करून
२२) बंडू च्या मुलीचे नाव काय होते?
१) नीता २) सोनू ३) गिता ४) सुबा
२३) आईने इजार कोठे फेकली?
१) अंगणात २) कोनाड्यात
३) कपाटात ४) टेबलावर
२४) राब राब राबणे- वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा.
१) घरात बसून राहणे २) खूप कष्ट करणे
३) काम न करणे ४) खूप मारणे
२५) इजारीची चड्डी झाली , यात मुख्य चूक कोणाची होती?
१) बंडूच्या आईची २) बंडूच्या बायकोची
३) बंडूची ४) बंडूच्या ताईची
संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421