⚜️️विद्याधन भाषिक उपक्रम – यमक दर्शक शब्द⚜️️

 ⚜️विद्याधन भाषिक उपक्रम – यमक दर्शक शब्द ⚜️ 

*शाळा बंद ... पण शिक्षण आहे.*

 ======================= *

 

खाली काही शब्द गट दिले आहेत. प्रत्येक शब्द गटात तीन शब्द आहेत. त्या प्रत्येक शब्दाचे अद्याक्षर दिले आहे. उर्वरित रिकाम्या जागी आपणास तीनही ठिकाणी समान अक्षरे लिहून अर्थपूर्ण शब्द तयार करावयाचे आहेत. असे शब्द तयार करुन  आपल्या वहीत  लिहा आणि आपल्या शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. यासाठी आपण आपल्या शिक्षकाची, मित्रांची, पालकांची मदत घेवू शकता आणि आपले भाषिक ज्ञान वाढवू शकता.*


उदा:- 

शब्द गट:-   व—— उ—— प——

             उत्तर   : -  वसंत उसंत पसंत

उत्तरसूची   

१)   सं——, भ—— ,स्वा——

उत्तर :- संगत, भगत, स्वागत

२)  ब—— ,प्र——, नि——

उत्तर :- बहार, प्रहार, निहार

३)  स——, टि—— ,अ——

उत्तर :- सटवी, टिटवी, अटवी 

४)फा——, का—— ,वा——

उत्तर :- फाकडा, काकडा, वाकडा

५) प्र—— ,अ—— ,नि——

उत्तर :- प्रस्तर, अस्तर, निस्तर

६)  नु——, गो——, टि——

उत्तर :- नुपूर, गोपूर, टिपूर

७) भ्र——, स——, क——

उत्तर :- भ्रतार, सतार, कतार

८) मु——, ब——, स्व——

उत्तर :- मुकुल, बकुल, स्वकुल

९)  चिं——, ज——, व——

उत्तर :- चिंतन, जतन, वतन

१०)   च——, आ——, फि——

उत्तर :- चतूर, आतूर, फितूर

११)    चहा——, वाव——, अ——

उत्तर :- चहाटळ, वावटळ, अटळ

१२)   बे——, स——, ति——

उत्तर :- बेरकी, सरकी, तिरकी

१३)   श——, प्र——, न——

उत्तर :- शहर, प्रहर, नहर

१४)  भ——, व——, भं——

उत्तर :- भजन, वजन, भंजन

१५)    व——, ग——, स——

उत्तर :- वरवा, गरवा, सरवा

 

संकलक व निर्मिती

श्री. बबन मोहन औटी.

पदवीधर प्राथमिक शिक्षक

जि.प.प्राथ. शाळा जांभळी,

केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर

📞  9421334421

https://babanauti16.blogspot.com