⚜विद्याधन मराठी उपक्रम – प्रश्नावली⚜
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
=======================
या ठिकाणी ३.वल्हवा रं वल्हवा (पाचवी मराठी) या गाण्यावर
आधारित प्रश्न दिले आहेत. त्या प्रश्नांच्या
उत्तराचा योग्य पर्याय प्रश्नाखाली दिलेल्या पर्यातून शोधून
आपल्या वहीत लिहा व आपल्या शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. त्यासाठी आपण आपल्या
शिक्षकांची, मित्रांची
किंवा पालकांची मदत घेवू शकता.
उत्तरसूची
1) अंगात नवीन जोम कोण
निर्माण करत आहे ?
1) लोक 2) देश 3)
तिरंगा 4) दौलत
2) एकजुटीने आपण कशाला रोखू शकतो असे कवीने म्हटले आहे ?
1) पावसाला 2)वादळाला 3) पाण्याला 4)
लोकांना
3) जोसानं .....आता वल्हवा
रं – वल्हवली
1) होडी 2) बोट 3) मशाल 4) नाव
4) मोकाट पिसाट ....आला
-येऊ द्या रं ,येऊ द्या रं ,
1) पाऊस 2) हिवाळा 3) बैल 4)
वारा
5) ... .. . . .माथ्यावर
तीन रंगी - तीन रंगी, तीन रंगी
1) टोपी 2) पगडी 3) झेंडा
6) संचारवी .........
नव अंगी , नव अंगी, नव अंगी.
1)
जोम 2) भार 3) दौलत 4) नाव
7)
........... चाले कशी
जलावरी-जलावरी-जलावरी
1) वारा 2) लाटा 3)
नौका 4) गाडी
8) होडी चालवणार्याला
काय म्हणतात ?
1)
नावाडी 2) मदारी 3) वैमानिक 4) सायकल स्वार
9) विमान चालवणार्याला
काय म्हणतात ?
1)
वैमानिक 2) नावाडी 3) मदारी 4) घुडस्वार
10)
विरुद्धार्थी शब्द लिहा . स्वातंत्र्य X -----------
1)
पारतंत्र्य 2) स्वेच्छा 3) अधिकार 4) मनमोकळेपणा
11)
कवीने मोलाची दौलत
कशाला म्हटले आहे ?
1) झेंडा 2) संपत्ती
3) लोकांना 4)
देशाच्या स्वातंत्र्याला
12)
समानार्थी शब्द लिहा.
शूर = -----------
1) भित्रा 2) लाजाळू 3) पराक्रमी
4) रडका
13)
'वल्हवा रं वल्हवा' हे गीत कोणी लिहिले आहे ?
1) सदाशिव माळी 2) वसंत बापट
3) मनोहर भोसले 4) प्रकाश नवाळे
14)
होडी चालवण्याची जबाबदारी कोणावर आहे ?
1) माणसांवर 2)
मुलांवर
3) पाण्यावर 4)
नावाड्यावर
15)
होडी कोण वल्हवत आहेत ?
1)
मुले 2) नावाडी 3) माणसे 4) कोळी
16)
लाटा झेलण्यासाठी कोण समर्थ आहे असे मुले म्हणतात ?
1) ढाल 2) सापळा 3) छाती 4)
हात
17)
माथ्यावर काय फडकत आहे ?
1)
तिरंगी झेंडा 2) वादळ 3) वारा 4) पक्षी
18)
अंगात नवीन जोम कोण
निर्माण करत आहे ?
1)
तिरंगा 2) वादळ 3) नावाडी 4) वारा
19)
खूप मोलाची दौलत काय
आहे असे मुले म्हणतात ?
1)
स्वातंत्र्य 2) ताकद 3) आत्मविश्वास 4) नौका
20)
'जलावरी' या शब्दासाठी कवितेत आलेला नादमय(यमक) शब्द कोणता ?
1) मोलाची 2) वल्हवली 3)
मुलांवरी 4) धीर
21) 'आस'
या शब्दासाठी कवितेत आलेला नादमय(यमक) शब्द कोणता ?
1) लाट 2) धीर 3) ध्यास 4) कसा
22) 'रंगी' या शब्दासाठी कवितेत आलेला नादमय(यमक) शब्द कोणता ?
1)
अंगी 2) जोम 3) नव 4) वीर
23) चारचाकी वाहन चालवणार्याला काय म्हणतात ?
1) माहुत 2) नावाडी 3)चालक 4) वैमानिक
24) 'नाव' हा शब्द कवितेत कोणत्या अर्थाने आलेला आहे ?
1) मुलांचे नाव 2) मुलींचे नाव 3) नाद 4)
होडी
25) रथ कोण हाकतो ?
1) टांगेवाला 2) नावाडी 3)सारथी
4) वैमानिक
संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक
शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा
जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी.
जि.अहमदनगर
📞 9421334421