⚜️विद्याधन भाषिक उपक्रम –विरुद्धार्थी शब्द⚜️

 

विद्याधन भाषिक उपक्रम – शब्द्संपत्तीवर प्रभुत्व

शाळा बंद ... पण शिक्षण आहे.

======================

या ठिकाणी काही अक्षर समूह दिले आहेत. त्यामधून त्या अक्षरांची जुळवाजुळव करून विरुद्धार्थाची जोडी तयार करून आपल्या वहीत लिहा आणि आपल्या शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. यासाठी आपण आपल्या शिक्षकाची, मित्रांची, पालकांची मदत घेवू शकता आणि आपले भाषिक ज्ञान वाढवू शकता.

उत्तरसूची 

 

उदा:-

अक्षर समूह :-  गी ज री स खा र का

विरुद्धार्थाची जोडीव:-  सरकारी X खाजगी

 

१) वि फ त क मो त

उत्तर :- विकत X मोफत


२) द मु ळ द्दे पा सू ल्हा

उत्तर :- मुद्देसूद X पाल्हाळ


३) उ सी प्र न दा न्न स

उत्तर :- उदासीन X प्रसन्न


४)  जा ड ल क त ने बा

उत्तर :- नेकजात X लबाड


५) ध व बं अ ट र्ध स

उत्तर :- सबंध X अर्धवट


६) ळू द ळ झु वा क

उत्तर :- झुळूक X वादळ


७) दा क क न्न स स

उत्तर :- कदान्न‌ X सकस


८) र ज मं कु र स्य बू सा

उत्तर :- कुरबूर X सामंजस्य


९) जा ट र अ क प्र ही

उत्तर :- अप्रकट X जाहीर


१०) चो ढि ळ सा ख

उत्तर :- चोख X ढिसाळ


११) दी ह वा अ ही ना ग्र ट

उत्तर :- हटवादी X अनाग्रही


*संकलक*

श्री. बबन मोहन औटी.

पदवीधर प्राथमिक शिक्षक

जि.प.प्राथ. शाळा जांभळी,

केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर

📞  9421334421

https://babanauti16.blogspot.com