⚜विद्याधन भाषिक उपक्रम – अवयावांवरून म्हणी व वाक्प्रचार ⚜
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
======================
या
ठिकाणी अवयवांवरून सुरु होणारे म्हणी व वाक्प्रचार यांच्या संक्षिप्त रूप दिले
आहे. त्यावरून पूर्ण ऊत्तरे शोधून आपल्या
वहीत ही प्रश्नावली सोडवा व आपल्या वर्गशिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. यासाठी आपण
आपल्या पालकांची किंवा मित्रांची मदत घेऊ शकता.
उत्तरसूची
१) आं मा ए डो दे दे दो डो
उत्तर :- आंधळा
मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे.
२) भिं का अ
उत्तर :- भिंतीला
कान असतात
३) ना पे मो ज
उत्तर :- नाका
पेक्षा मोती जड
४) ना का
उत्तर :- नाकदुऱ्या
काढणे
५) क क हो
उत्तर :- कर्णोपकर्णी
होणे
६) हा दा अ
उत्तर :- हात
दाखवून अवलक्षण
७) हा कां आ क
उत्तर :- हातच्या
कांकणाला आरसा कशाला
८) पा व पा ब
उत्तर :- पायीची
वहाण पायी बरी
९) पा पा घा
उत्तर :- पायात
पाय घालणे
१०) ना न ये
उत्तर :- नाकी
नऊ येणे
११) न ल स सा वि
उत्तर :- नकटीच्या
लग्नाला सतराशे साठ विघ्न
१२) आ पो म वि
उत्तर :- आधी
पोटोबा मग विठोबा
१३) पा न
उत्तर :- पायपोस
नसणे
१४) आ अं घे शिं
उत्तर :- आली
अंगावर घेतली शिंगावर
१५) वा पा पा फि
उत्तर :- वारा
पाहून पाठ फिरवणे
१६) ना मि झों
उत्तर :- नाकाला
मिरच्या झोंबणे
१७) मा कु
उत्तर :- मातीचे
कुल्ले
१८) को पा न
उत्तर :- कोपरा
पासून नमस्कार
१९) अं दा
उत्तर :- अंगठा
दाखविणे
२०) उ जी ला टा
उत्तर :- उचलली
जीभ लावली टाळ्याला
संकलक व निर्मिती
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421