⚜️विद्याधन - गणित व विज्ञान विषयाचे ऑनलाईन प्रशिक्षण⚜️

 ⚜️विद्याधन -  गणित व विज्ञान विषयाचे ऑनलाईन प्रशिक्षण⚜️


    केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ आयआयटी व आईसर पुणे या नामांकित संस्थांच्या संयुक्त विद्यमाने सर्व माध्यमांच्या सर्व इयत्ता साठी गणित व विज्ञान विषयाचे ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचे सुरू आहे सदर प्रशिक्षणात गणित व विज्ञान विषयाच्या विविध संकल्पना तत्त्वे रंजकता व सौंदर्यदृष्टी याबाबत ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात येणार आहे प्रत्येक रविवारी संध्याकाळी चार ते पाच या कालावधीत हे प्रशिक्षण असेल सदर प्रशिक्षण हे 30 आठवड्यांचे आहे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना आयआयटी व आईसर यांचेमार्फत इंटर्नशिप करण्याची संधी देण्यात येईल हे प्रशिक्षण अत्यंत दर्जेदार असल्याने आपल्या शाळेतील गणित व विज्ञान विषय शिक्षकांना ऑनलाइन उपस्थित राहण्याबाबत व लिंक भरण्याबाबत अवगत करण्यात यावे .
        तरी सर्व केंद्र प्रमुख यांनी आपल्या केंद्रातील किमान पाच गणित/ विज्ञान शिक्षकांना सदर प्रशिक्षणासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी प्रवृत्त करावे.

तसेच सदर प्रशिक्षणात पालक आणि विद्यार्थी सुद्धा सहभागी होऊ शकतात 


प्रशिक्षण रजिस्ट्रेशनसाठी खालील बटनाला क्लिक करा. 


 प्रशिक्षणाबाबत SCERT PUNE कार्यालयाचे अधिकृत पत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.

 *संकलक*
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर