⚜विद्याधन परिसर अभ्यास:१ (विज्ञान) उपक्रम – प्रश्नावली⚜
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
=======================
या ठिकाणी १. आपली पृथ्वी-आपली सूर्यमाला (पाचवी – परिसर अभ्यास:१विज्ञान) या पाठावर आधारित प्रश्न दिले आहेत. त्या प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय प्रश्नाखाली दिलेल्या पर्यातून शोधून आपल्या वहीत लिहा व आपल्या शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. त्यासाठी आपण आपल्या शिक्षकांची, मित्रांची किंवा पालकांची मदत घेवू शकता.
प्रश्नावली
१] आकाशातील सर्व वस्तूंना काय म्हणतात ?
1) तारे 2) ग्रह 3) खगोलीय वस्तू 4) सूर्यमाला
२] ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना काय म्हणतात ?
1) ग्रह 2) पृथ्वी 3) चंद्र 4) तारे
३] सूर्य हा एक ......आहे .
1) चेंडू 2) तारा 3) बटू 4) ग्रह
४] ग्रहांना स्वतःचा प्रकाश असतो .
1) सत्य 2) असत्य 3) कधी कधी 4) सतत
५] ग्रह स्वतःभोवती फिरता फिरता कोणाभोवती फिरतात ?
1) उपग्रह 2) लघुग्रह 3) बटू ग्रह 4) सूर्य
६] पृथ्वी स्वतः भोवती फिरते याला काय म्हणतात ?
1) परिवलन 2) परिभ्रमण 3) भ्रमण 4) चक्राकार फिरणे
७] सूर्याभोवती भ्रमण करणारा सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
1) शुक्र 2) पृथ्वी 3) बुध 4) मंगळ
८] पृथ्वीचा उपग्रह कोणता ?
1) मंगळ 2) चंद्र 3) चांदण्या 4) बुध
९] कोणत्या दोन ग्रहांच्या दरम्यान लघुग्रहाचा पट्टा आहे ?
1) मंगळ पृथ्वी 2) मंगळ गुरु 3) मंगळ बुध 4) बुध पृथ्वी
१०] ग्रह व तारे यांच्या दरम्यान असलेली रिकामी जागा म्हणजे काय ?
1) आकाश 2) अवकाश 3) मैदान 4) पटांगण
११] खगोलीय वस्तू कोणत्या आहेत ?
1) सूर्य 2) चंद्र 3) तारे 4) सर्व पर्याय बरोबर
१२] ज्या चांदण्या लुकलूकतात त्यांना तारे म्हणतात.
1) चूक २) बरोबर
१३] ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो.
1) चूक 2)बरोबर
१४] आपण कोणत्या ग्रहावर राहतो?
1) मंगळ २) गुरू ३) पृथ्वी 4) शनि
१५] पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी किती वेळ लागतो ?
1) 12 तास 2) 20 तास 3) 24 तास 4) 365 दिवस
१६] पृथ्वीवरील वस्तू पृथ्वीवरच का राहतात ?
1) ग्रह असल्यामुळे 2) गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे
3) परिवलणामुळे 4) परिभ्रमणामुळे
१७] पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे ?
1) शनि 2) सूर्य 3) मंगळ 4) चंद्र
१८] खालील पैकी स्वयंप्रकाशित कोण आहे ?
1) चंद्र 2) पृथ्वी 3) सूर्य 4) ग्रह
१९] सुर्यपासून सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
1) बुध 2) गुरू 3) शुक्र 4) पृथ्वी
२०] सर्वात मोठा ग्रह कोणता आहे ?
1) शनि 2) पृथ्वी 3) मंगळ 4) गुरू
२१] अंतराळात चंद्रावर जाणारे सर्वात पहिले भारतीय अंतराळवीर कोण ?
1) सुनीता विल्यम्स 2) कल्पना चावला 3) राकेश शर्मा
२२] पृथ्वीला सुर्यभोवती एकफेरी पूर्ण करण्यास किती दिवस लागतात ?
1) 360 2) 240 3) 365 4) 300
२३]पृथ्वी सूर्य पासून कितव्या क्रमांकावर आहे ?
1) 1 2) 2 3) 3 4) 4
२४] अयोग्य पर्याय ओळखा.
1) आकाशातील सर्व वस्तूंना 'खगोलीय वस्तू' असे म्हणतात.
2) ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात. त्यांचा प्रकाश कमी-जास्त होताना दिसतो. तारे स्वयंप्रकाशित असतात.
3) ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात. ग्रहांना स्वत:चा प्रकाश नसतो. त्यांना ताऱ्यांकडून प्रकाश मिळतो. ग्रह स्वत:भोवती फिरता फिरता ताऱ्याभोवती फिरतात.
4) सूर्य हा एक तारा असून इतर ताऱ्यांच्या मानाने तो आपल्यापासून दूर असूनही मोठा व तेजस्वी दिसतो.
२५] अयोग्य पर्याय ओळखा.
1) आपली पृथ्वी हा एक ग्रह असून तिला सूर्यापासून प्रकाश मिळतो.
२) पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याला पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात.
3) सूर्याभोवती बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनि, युरेनस, नेपच्यून हे ग्रह ठरावीक मार्गावरून ( त्या त्या ग्रहाच्या कक्षेतून ) परिभ्रमण करतात.
4) सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे आकाशगंगा म्हणतात.
२६] चंद्र हा ••••• उपग्रह आहे.
1) सूर्याचा 2) पृथ्वीचा 3) गुरूचा 4) शनिचा
२७] गटातील वेगळा पर्याय निवडा.
1 ) बुध 2) युरेनस 3) नेपच्यून 4) प्लुटो
२८] ••••• व ••••• या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे.
1) मंगळ, गुरू 2) पृथ्वी, मंगळ 3) गुरू, शनि 4) बुध, शुक्र
२९] मंगळ ग्रहाच्या कक्षेच्या बाहेर असणाऱ्या ग्रहांतील शेवटचा ग्रह कोणता ?
1) नेपच्यून 2) युरेनस 3) शनि 4) गुरू
३०] सूर्यापासून सर्वांत दूरचा ग्रह कोणता ?
1) प्लुटो 2) युरेनस 3) नेपच्यून 4) गुरू
३१] ग्रह सूर्याभोवती ठरावीक अंतरावरून ठरावीक कक्षेत ••••• करत असतात.
1) परिवलन 2) परिभ्रमण 3) ये-जा 4) टक्कर
३२] पृथ्वीवरून एखादी वस्तू अवकाशात पाठवण्यासाठी तिला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध शक्ती द्यावी लागते. त्यासाठी वापरात येणाऱ्या तंत्रास '•••••' म्हणतात.
1) अवकाश संशोधन तंत्र 2) थेट प्रक्षेपण तंत्र
3) अवकाश प्रक्षेपण तंत्र 4) संदेशवहन प्रक्षेपण तंत्र
३३] 'भारतीय अवकाश संशोधन संस्था' (I.S.R.O. : Indian Space Research Organization) मार्फत 'चंद्रयान १' ही मोहीम आखून चंद्रावर ••••• रोजी यान सोडले होते.
1) ५ नोव्हेंबर २०१३ 2) २४ सप्टेंबर २०१४
3) २२ जुलै २०१९ 4) २२ ऑक्टोबर २००८
३४] १९८४ साली अवकाशात जाणारे ••••• हे पहिले भारतीय अंतराळवीर होत.
1) युरी गागारीन 2) राकेश शर्मा
3) सुनिता विल्यम्स 4) कल्पना चावला
३५] शेती, पर्यावरणाचे निरीक्षण, हवामान अंदाज,नकाशे तयार करणे, पृथ्वीवरील पाणी व खनिज संपत्तीचा शोध घेणे व संदेशवहन करण्यासाठी ••••• वापरतात.
1) ग्रह 2) नैसर्गिक उपग्रह
3) कृत्रिम उपग्रह 4) अग्निबाण
३६] अयोग्य विधान ओळखा.
1) पृथ्वीसारखी सजीवसृष्टी असलेला एकही ग्रह अवकाश संशोधकांना अद्याप आढळलेला नाही.
2) मंगळावर पृथ्वीसारखी सजीवसृष्टी आढळली आहे.
3) पृथ्वीवरील पर्यावरणाची कोणत्याही कारणाने होणारी हानी सजीव सृष्टीच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरते.
4) अमेरिकेतील संशोधक गेलार्ड नेल्सन यांनी पृथ्वीवरील हवा, पाणी, वने आणि वन्यजीव निसर्ग यांच्या संरक्षणासाठी मांडलेल्या संकल्पनेतून पृथ्वीचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने १९७० पासून २२ एप्रिल हा दिवस 'अर्थ डे' ( वसुंधरा दिन ) म्हणून जगभर साजरा केला जातो.
संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421
