⚜️विद्याधन उपक्रम – सामान्यज्ञान प्रश्नावली⚜️

 

विद्याधन उपक्रम सामान्यज्ञान प्रश्नावली

*शाळा बंद...पण शिक्षण आहे.*

=========================

या ठिकाणी दिलेल्या प्रश्नावलीतील प्रश्नांची उत्तरे म्हणजे ऋषींची नावे आहेत. तर चला मग आपल्याला माहित असलेल्या ऋषींची नावे ओळखा आणि आपल्या वहीत लिहा व आपल्या वर्गशिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. यासाठी आपल्या मित्रांची किंवा पालकाची मदत घेऊ शकता. चला तर सोडवा प्रश्नावली.......

                                          उत्तरसूची


) ज्यांनी समुद्रप्राशन केला ?

उत्तर :-   अगस्ती

  

) ह्या ऋषींना भगवान परशुरामांनी पृथ्वी दान केली होती ?

उत्तर :-   कश्यप

 

) ह्या ऋषींनी कुंतीला वरदान दिले होते ?

उत्तर :-   दुर्वास 

 

) ह्या ऋषींच्या अस्थी पासून एक शस्त्र बनविले होते ?

उत्तर :-   दधीची

 

) परशुरामाचे वडील आणि शंकराचा एक अवतार ?

उत्तर :-   जमदग्नी

 

) चंद्राचे वडील ?

उत्तर :-   अत्री

 

) महर्षी वेद व्यासांचे वडील ?

उत्तर :-   पराषर 

 

) ह्या ऋषींचा ग्रह , तारे, तसेच भविष्य शास्त्र याचा अभ्यास होता ?

उत्तर :-   गर्ग

 

) मेनका हिने या ऋषींचा तपोभंग केला होता ?

उत्तर :-   विश्वामित्र 

 

१०) विष्णूचा अवतार वामन ह्यांच्या आई वडिलांची नावे ?

उत्तर :-   कश्यप

 

११) श्री रामाचे गुरु ?

उत्तर :-   विश्वामित्र

 

१२) श्री कृष्णा चे गुरु ?

उत्तर :-   सांदिपनी 

 

१३) कौरव आणि पांडव यांचे गुरु ?

उत्तर :-   द्रोणाचार्य 

 

१४) द्रोण भीष्म पितामह यांचे गुरू ?

उत्तर :-   परशुराम 

 

१५) ह्या ऋषींनी शकुंतला हीचा सांभाळ केला होता ?

उत्तर :-   कण्व ऋषी

 

१६) ह्या ऋषींचा अणु रेणू चा अभ्यास होता ?

उत्तर :-   कणाद

 

१७) या ऋषींच्या नावाने एक पक्षी आहे ?

उत्तर :-   भारद्वाज 

 

१८) लवकुशांचा सांभाळ केला ?

उत्तर :-   वाल्मिकी 

 

१९) गुरुपौर्णिमा हा उत्सव यांचे स्मरण म्हणून केला जातो

उत्तर :-   व्यास

 

२०) गणपतीस्तोत्र या महर्षींनी लिहिले?

उत्तर :-   महर्षि नारद

 

*संकलक व निर्मिती*

श्री. बबन मोहन औटी

पदवीधर प्राथमिक शिक्षक

जि.प.प्राथ. शाळा जांभळी,

केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर

 📞 9421334421

https://babanauti16.blogspot.com