⚜️विद्याधन भाषिक उपक्रम – म्हणी व वाकप्रचार⚜️

 

विद्याधन भाषिक उपक्रम म्हणी व वाकप्रचार
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
 =============================

या ठिकाणी काही  म्हणी/वाक्प्रचारांचे अर्थ दिले आहेत.आपणास  त्यावरून  मूळ म्हण/वाक्प्रचार शोधून आपल्या वहीत लिहा आणि आपल्या वर्गशिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. यासाठी आपण आपल्या पालकांची किंवा मित्रांची मदत घेऊ शकता. लक्षात ठेवा, उत्तराची सुरुवात ‌'' च्या बाराखडी ने होत आहे...

 

उत्तरसूची

 

१) धनसंपन्न‌ स्त्रीने गरीबा सारखे रहाणे

उत्तर :- लंकेची पार्वती होणे

 

२ बदनामी करणे

उत्तर :- लक्तरे वेशीवर टांगून ठेवणे

 

३ पूर्ण नामोहरम करणे

उत्तर :- लगदा करणे

 

४ निष्कारण उठाठेवी करणे

उत्तर :- लष्कराच्या भाकऱ्या भाजणे

 

५ कलंक लावणे

उत्तर :- लांच्छन लावणे

 

६ खुशामत करणे

उत्तर :- लांगूलचालन करणे

 

७ वयाला न शोभणारे वर्तन

उत्तर :- लहान तोंडी मोठा घास

 

८ अनादराने त्याग करणे

उत्तर :- लाथ मारणे

 

९ सांत्वन करणे

उत्तर :- लेप लावणे

 

१० बंधने‌ घालणे

उत्तर :- लोढणे अडकवणे

 

११ फार कष्ट सोसणे

उत्तर :- लोखंडाचे चणे खाणे

 

१२ आत बट्ट्याचा व्यवहार

उत्तर :- लाखाचे बारा हजार होणे

 

१३ तगादा लावणे

उत्तर :- लकडा लावणे

 

१४ हिंमतीवर वाटेल ते करण्याची तयारी

उत्तर :- लाथ मारीन तिथे पाणी काढीन

 

१५ एकाला उद्देशून पण दुसर्याला लागेल असे बोलणे

उत्तर :- लेकी बोले सुने लागे

 

१६ लोकांना उपदेश स्वत: कसेही वागणे

उत्तर :- लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण

 

१७ मिळकतीप्रमाणे खर्चही जास्त

उत्तर :- लंकेत सोन्याच्या विटा

 

१८ काम नाही काडीचं नुसताच तोरा

उत्तर :- लगा लगा मला बघा

 

१९ अडचणीच अडचणी नुसता गोंधळ

उत्तर :- लग्न बघावे करून आणि घर पाहावे बांधून

 

२० मुख्य कार्यापेक्षा गौण कार्याला अधिक खर्च

उत्तर :- लग्नाला वीस तर वाजंत्रीला तीस

 

संकलन व निर्मिती

श्री. बबन मोहन औटी.

पदवीधर प्राथमिक शिक्षक

जि.प.प्राथ. शाळा जांभळी,

केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर

📞  9421334421

https://babanauti16.blogspot.com