⚜️UIDAI ने सांगितला आधार सुरक्षित ठेवण्याचा नवा पर्याय⚜️
असा लॉक करा तुमचा आधार कार्ड नंबर
भारतीय नागरिकत्व असलेल्या प्रत्येकासाठी आधार कार्ड अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. बँक अकाउंट ओपन करण्यापासून ते इनकम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठीही याची गरज लागते. सर्वच कामांसाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. त्यामुळे आधार कार्ड सुरक्षित ठेवणं आणि याचा दुरुपयोग होण्यापासून रोखणं आवश्यक आहे. सरकारने आधारची सिक्योरिटी मजबूत करण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात UIDAI आधार कार्डधारकांना एक अशी सुविधा देत आहे, ज्यात प्रत्येक जण आपला आधार नंबर लॉक आणि अनलॉक करू शकतात. यामुळे आधार नंबरची प्रायव्हसी आणि सिक्योरिटी अधिक मजबूत होते.
आधार नंबर लॉक करणं -
- सर्वात आधी uidai.gov.in वेबसाईटवर जा. त्यानंतर आधार सर्विसेजअंतर्गत आधार लॉक अँड अनलॉक सर्विसवर क्लिक करा.
- आता UID वर क्लिक करा.
- आता 12 अंक आधार नंबर टाकावा लागेल. त्यानंतर आधारमध्ये दिल्याप्रमाणे पूर्ण नाव टाका. तसंच पिनकोडही टाका.
- त्यानंतर कॅप्चा कोड टाकावा लागेल.
- आता सेंड OTP वर एंटर करा.
- जसं मोबाईलमध्ये हा वन टाईम पासवर्ड OTP टाकाल, तसं आधार नंबर लॉक होईल.
- याच प्रोसेसनुसार, आधार नंबर अनलॉकही करू शकता.
============================================================
SMS द्वारे लॉक -
UIDAI नंबर SMS द्वारे लॉक करण्यासाठी आधार कार्डधारकाकडे 16 अंकी VID नंबर लागतो. जर एखाद्याकडे VID नंबर नसेल, तर SMS सर्विस किंवा UIDAI वेबसाईटवर रजिडेंट पोर्टलद्वारे जनरेट करू शकता. महत्त्वाची बाब म्हणजे, SMS द्वारे व्हर्चुअल ID (VID) जनरेट करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर UIDAI च्या डेटाबेसमध्ये रजिस्टर्ड असावा.
- रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरुन OTP साठी 1947 वर SMS करा. या मेसेजमध्ये तुमच्या आधार नंबरचे शेवटचे 4 अंक टाकावे लागतील. समजा आधार नंबर 1567 6754 7654 असल्यास, मेसेजमध्ये GETOTP7654 असं लिहावं लागेल.
- SMS पाठवल्यानंतर UIDAI ला एसएमएसद्वारे 6 अंकी OTP पाठवला जाईल.
- आता आणखी एक SMS पाठवावा लागेल, LOCKUID लिहून आधार कार्डचे शेवटचे 4 नंबर आणि 6 अंकी OTP नंबर टाका. त्यानंतर SMS पाठवल्यावर UIDAI तुमचा आधार नंबर लॉक करेल. याचा कंफर्मेशन मेसेज मिळेल.
=================================================================
आधार बायोमेट्रिक्स लॉक -
- uidai.gov.in वेबसाईटवर जा.
- त्यानंतर आधार सर्विसेजअंतर्गत लॉक-अनलॉक बायोमेट्रिक्सवर क्लिक करा.
- नवीन पेज ओपन होईल, येथे टिक मार्क केल्यानंतर लॉक-अनलॉक बायोमेट्रिक्सवर क्लिक करा.
- 12 अंकी आधार नंबर टाका.
- त्यानंतर कॅप्चा कोड टाका आणि सेंड OTP वर क्लिक करा.
- यानंतर बायोमेट्रिक्स लॉक होईल.
=========================================================