⚜️मत्ता व दायित्व विवरणपत्र⚜️
दि. 31 मार्च च्या स्थितीस अनुसरून सर्व सरकारी कर्मचारी यांना मत्ता व दायित्व प्रपत्र आपण ज्या कार्यालयात कार्यरत आहोत त्या कार्यालयात जमा करायचे असतात. परंतु बरेच कर्मचारी हे प्रपत्र कार्यालयात जमा करत नाहीत त्यामुळे पदोन्नती किंवा आर्थिक श्रेणीवाढ कर्मचार्यांना देतांना अडचण निर्माण होऊ शकते. आज या पोस्ट च्या माध्यमातून मत्ता व दायित्व (Assets and Liability) प्रपत्र कसे भरावे ते आपण पाहणार आहोत.
सर्व सरकारी कर्मचारी बंधू भगिनी मिळणाऱ्या वेतनातून चल किंवा अचल मालमत्ता विकत घेवू शकतो. यासाठी ते कर्ज काढू शकतात. त्यामुळे आपल्याला दरवर्षी 31 मार्च या तारीखेला अनुसरून आपल्याला तीन प्रकारात माहिती सादर करावी लागते. यात चल प्रपत्र, अचल प्रपत्र, दायित्व प्रपत्र समाविष्ट असते.
==================
1)अचल मालमत्ता म्हणजे ?
अचल मालमत्ता म्हणजे अशी संपत्ती जी हलवता येत नाही. ज्यात तुमचे घर, प्लॉट, flat किंवा दुकान ह्यांचा समावेश होत असतो. अचल मालमत्ता तुमच्या स्वताच्या मालकीची असो किंवा तुम्हाला वंशपरंपरेने मिळाली असेल किंवा कोणी भेट म्हणून दिली असेल त्या सर्व मालमत्तेचा उल्लेख आपल्याला अचल मालमत्ता प्रपत्र भरताना करावयाचा .
👉प्रपत्र 1- अचल मालमत्तेचे विवरण
यामध्ये फक्त आपल्या रेशनकार्डमध्ये नावे असणाऱ्या आई-वडिल,स्वतः व पत्नीच्या नावाने घर,जमिन,सदनिका,जागा,व्यापारी गाळे इ.ची खरी व अचूक माहिती भरावी..कारण पुढील विवरण पत्रात संपत्ती मध्ये अचानक वाढ दिसुन आल्यास आपण अडचणीत येऊ नये यासाठी काळजी घ्यावी.आपल्या आई वडिलांचे वेगळे रेशनकार्ड असेल तर त्यांची मालमत्ता लिहु नये..फक्त पती पत्नी च्या नावावरीलच मालमत्ता लिहावी)
1)अनुक्रमांक लिहावा.
2)ज्या गावात/शहरात मालमत्ता आहे तो पत्ता,तालुका,जिल्हा सह)
3)क्षेत्रफळ -मालमत्ता तपशील जमिन एकर,जागा व घर स्क्वेअर फुट /मीटर मध्ये लिहावे
4)मालमत्ता खरेदीची असल्यास शासकीय स्टँप ड्युटी नुसार खरेदीची किंमत लिहावी..बागायती जमिन किमान ५ लाख रुपये एकर व बांधकाम असल्यास किमान १००० रुपये प्रति स्क्वेअर फुट प्रमाणे रक्कम लिहावी..वडिलार्जित असल्यास नावावर कधी झाली ते वर्ष लिहावे.
5)मालमत्तेची वरील दराप्रमाणे रक्कम लिहावी.
6)मालमत्ता धारक व्यक्तीशी नाते लिहावे..जसे स्वतः ,पत्नी,पती,आई,वडिल
7)मालमत्ता कशी मिळाली ते नमुद करावे.
8)मालमत्ते पासुनचे उत्पन्न योग्य दाखवावे..सदर रक्कम करपात्र ठरु शकते त्यामुळे योग्य तेच उत्पन्न दाखवा..
9)शेरा-आणखी काही तपशील असेल तरच लिहावा...
==================
2) चल मालमत्ता म्हणजे ?
तुमच्या कडे असलेली दागदागिने, रत्न, बँक खात्यातील रोकड, पोस्टातील bonds, पीपीएफ ची रक्कम, तुमच्या कडे असलेली वाहने, mobile, घरातील सर्व महाग इलेक्ट्रोनिक्स वस्तूंचा सुद्धा समावेश ह्या मध्ये होत असतो.
👉प्रपत्र 2-चल मालमत्तेचे विवरण
(यामध्ये रोख व बँकेतील पोस्टातील रक्कम ,विमा पाॕलिसीमध्ये आजपर्यंत भरलेली रक्कम ,शिक्षक सोसायटीतील शेअर्सव ठेवी,सोने ,चांदी,हिरे,धातु,रत्न,चारचाकी गाडी,दुचाकी,टी.व्ही,फ्रीज,AC,)
1)अ.क्रमांक
2)वर नमुद केलेल्या मालमत्तेविषयी तपशील उदा..
(रोख रक्कम, बँकेतीलक शिल्लक रक्कम,फंड शिल्लक , शिक्षक सोसायटी भाग, ठेव, LIC गुंतवणूक इ., सोने, चांदी, चारचाकी गाडी,दोनचाकी गाडी)
3)गुंतवणूक केलेल्या मालमत्ता तपशील व संस्था,बँक,पोस्ट इ.चा पत्ता
4)मालमत्तेची सध्याच्या दरानुसार किंमत लाखात लिहावी.
5)मालमत्ता घरातील कोणाच्या नावावर आहे ते नाते लिहावे.
(सदरची गुंतवणूक किमान ५० हजाराच्या वरील असेल तरच लिहावी)
==================
3) दायित्व
दायित्व म्हणजे आपल्याला कोणाचे किती कर्ज परत करायचे आहे किंवा कर्मचार्यावर किती कर्ज आहे हे नमूद करावयाचे असते.
👉प्रपत्र३-दायित्वाचे विवरण*(यामध्ये सोसायटी ,बँक,घराचे,गाडीचे कर्ज तपशील लिहावा.)
1)अ.क्रमांक
2)रक्कम -कर्जाची रक्कम लिहावी..लाखात
3)धनकोचे नाव व पत्ता..उदा.प्राथमिक शिक्षक पतसंस्था इंदापुर,बँक आँफ महाराष्ट्र इ.
4)दायित्व पत्करल्याचा दिनांक म्हणजे कर्ज घेतल्याची तारीख (महिना,वर्ष लिहिले तरी चालेल)
5)व्यवहाराचा तपशीशंल..उदा..घर बांधकाम कर्ज,पतसंस्था कर्ज, गाडी खरेदी कर्ज
6)शेरा-
==================