⚜️बंध विश्वासाचे⚜️
एकदा एक छोटी मुलगी आणि तिचे वडील एक पूल पार करत असतात. मुलगी पडेल, याची वडिलांना थोडी भीती वाटते आणि ते तिला म्हणतात... 'बाळा, माझा हात धर’.
मुलगी पटकन म्हणते, “नको बाबा, तुम्हीच माझा हात धरा’
वडील कौतुकाने विचारतात, “अगं बाळा, काय फरक पडतो?’
मुलगी म्हणते, “खूप फरक पडतो बाबा. मी तुमचा हात धरला आणि मला काही झाले, तर मी पटकन हात सोडून देईन. पण मला माहितीय, तुम्ही माझा हात धरला असताना काहीही झालं तरी तो सोडणार नाही.’
तात्पर्य :- कोणत्याही नात्यामधील विश्वास बंधनकारक नसतो, तर तो एक न तुटणारा बंध असतो.