⚜️We Learn English - दिवस सत्ताविसावा⚜️

⚜️We Learn English - दिवस सत्ताविसावा⚜️

 पाठ सत्ताविसावा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇

A'NAGAR- WLE CLASS 4 - Lesson 27

⚜️ या  पाठावर आधारित सरावासाठीचे  प्रश्न  व इतर माहिती 


⚜️विशेष सरावाचा शेवटचा दिवस

⚜️विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही गोष्टीचा सराव होणे फार महत्वाचे असते. इंग्रजी विषय चांगला होण्यासाठी तुम्ही नक्की सराव करा.*


  

⚜️Read carefully the following sentences and write down in your notebook. (रीड केअरफुली द फॉलविंग सेंटेन्सेस अॅड राईट डाऊन इन युअर नोटबुक)* 

⚜️खालील वाक्ये काळजीपूर्वक वाच आणि वहीत लिहून घे.


1) Shut the door.
(शट् द डोअर) 
दरवाजा बंद कर.

2) Shut the window.
(शट् द विंडो) 
खिडकी बंद कर.

3) I have a dog.
(आय हॅव अ डॉग) 
माझ्याकडे कुत्रा आहे. 

4) This is my dog.
(दिस ईज माय डॉग) 
हा माझा कुत्रा आहे. 

5) This is Mangala's dog. 
(दिस ईज मंगलास डॉग) 
हा मंगलाचा कुत्रा आहे. 

6)  This is her dog. 
(दिस ईज हर डॉग) 
हा तिचा कुत्रा आहे. 

7) This is my book. 
(दिस ईज माय बुक) 
हे माझे पुस्तक आहे. 

8) This is his book. 
(दिस ईज हिज् बुक) 
हे त्याचे पुस्तक आहे. 

9) This is my sharpener. 
(दिस ईज माय शार्पनर) 
हे माझे टोकयंत्र आहे. 

10) This is her notebook. 
(दिस ईज हर नोटबुक) 
ही तिची वही आहे. 

⚜️प्रश्नाचे उत्तर कसे द्यायचे ते लक्षात घे आणि वहीत लिहून घे व योग्य वेळी त्याचा वापर कर.*

1) Whose book is this? 
(हुज् बुक ईज दिस?) 
हे पुस्तक कोणाचे आहे? 

Answer (उत्तर खालीलप्रमाणे) 
स्वतःचे पुस्तक असेल तर.. 
This is my book. 

मित्राचे पुस्तक असेल तर... 
This is his book. 

मैत्रिणीचे पुस्तक असेल तर.. 
This is her book. 

एक गोष्ट लक्षात घे की वरीलप्रमाणे whose चा प्रश्न आला तर.... 
स्वतःसाठी my शब्द वापरतात. 
दुसर्‍या मुलासाठी his शब्द वापरतात व
 मुलीसाठी her वापरतात.

⚜️तुला वर्गात काही स्वतःच्या वस्तू तसेच इतरांच्या दाखवून खालीलप्रमाणे प्रश्न विचारता येतील.

1) Whose pen is this? 
(हुज् पेन ईज दिस?) 
हे कोणाचे पेन आहे? 

2) Whose notebook is this? 
(हुज् नोटबुक ईज दिस?) 
ही कोणाची वही आहे? 

3) Whose sharpener is this? 
(हुज् शार्पनर ईज दिस?) 
हे कोणाचे टोकयंत्र आहे? 

4) Whose pencil is this? 
(हुज् पेन्सिल ईज दिस?) 
ही कोणाची पेन्सिल आहे? 

5) Whose ruler is this?
 (हुज् रूलर ईज दिस?) 
ही कोणाची फुटपट्टी आहे? 

⚜️Read carefully the following questions and write down in your notebook. 
(रीड केअरफुली द फॉलविंग क्वेशन्स अँड राईट डाऊन इन युअर नोटबुक) 
खालील प्रश्न काळजीपूर्वक वाच आणि वहीत लिहून घे. 

1) Whose book is that? 
(हुज बुक ईज दॅट?) 
ते कोणाचे पुस्तक आहे? 

Answer - That is Ram's book. 
(दॅट ईज रामस् बुक) 
ते रामचे पुस्तक आहे. 

2) Whose pencils are these? 
(हुज पेन्सिलस् आर दीज्?) 
त्या कोणाच्या पेन्सिली आहेत?) 

Answer - These are my pencils. 
( दीज् आर माय पेन्सिलस्) 
त्या माझ्या पेन्सिली आहेत.



====================================
⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
जि.प.प्राथमिक शाळा जांभळी, केंद्र- सडे
ता. राहुरी. जि. अहमदनगर
📞9421334421
====================================