⚜️उतारा वाचन भाग २१⚜️
ही माझी शाळा. मी शाळेत दररोज जातो. माझ्या शाळेभोवती बाग आहे. बागेत अनेक फुलझाडे आहेत. त्यांना मी दररोज पाणी घालतो. बागेतील गवतही काढतो. नियमितपणे शाळेची साफसफाई करतो. गुरुजी मला रोज अभ्यास देतात. तो अभ्यास मी दररोज पूर्ण करतो. मला माझी शाळा खूप आवडते.
⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) शाळेभोवती काय आहे ?
२) मुलगा शाळेत काय काय आहे ?
(३) बागेत काय आहे ?
४) बागेतील गवत कोण काढते ?
५) तुमच्या शाळेची साफसफाई कोण करते?
६) मुलाला रोज अभ्यास कोण देते ?
७) वाक्यात उपयोग करा.
दररोज, शाळा, अभ्यास
८) मुलाला शाळा का आवडते ?
९) तुमच्या शाळेतील बागेत फुलझाडे आहेत काय ? त्यांना पाणी कोण घालते ?
१०) तुम्ही दररोज कोणकोणती कामे करता ते लिहा.
(११) वरील उताऱ्यात कोणते जोडाक्षरयुक्त शब्द आलेले आहेत ?
१२) पुढील शब्दाचा अनेकवचनी शब्द सांगा.
फुलझाड